पुरुष-महिला मुंबई जिल्हास्तरीय निवड चाचणी खो खो स्पर्धा २०२०-२१
मुंबई: गेले जवळ जवळ वर्षभर कोविड परिस्थितीमुळे मैदानावर सामने होऊ शकले नव्हते. पण नुकतीच भारतीय खो-खो महासंघाने राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा उस्मानाबादला जाहीर केल्याने व महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनने राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा पालघरला जाहीर केल्यामुळे मुंबई खो-खो संघटनेने पुरूष महिलांची जिल्हास्तरीय निवड चाचणी खो-खो स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा १९ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत लाल मैदान, आई माई मेरवानजी रोड, परळ येथे होणार आहे.
सदर स्पर्धेत मुंबईतील जवळजवळ सर्व मातब्बर संघ सहभागी होणार असल्यामुळे १९ ला सकाळ-संध्याकाळच्या सत्रात सामने आयोजित केले आहेत. २० व २१ तारखेला मात्र सायंकाळच्या सत्रात सामने होणार आहेत.
महिलांमध्ये शिवनेरी अमर हिंद श्री समर्थ व सरस्वती कन्या शाळा यांच्यामध्ये विजेतेपदासाठी चुरस दिसून येईल. तर पुरुषांमध्ये सरस्वती स्पोर्ट क्लब, ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर, श्री समर्थ व्यायम मंदिर व अमर हिंद मंडळ यांच्या विजेतेपदासाठी विशेष चुरस पाहायला मिळेल.
सदर जिल्हास्तरीय निवड चाचणी खोखो स्पर्धा शासन व महापालिकेने दिलेल्या कोविड नियमावली नुसार पार पडेल असे मुंबई खो-खो संघटनेचे कार्यवाह सुरेंद्र विश्वकर्मा यांनी कळवले आहे.
478 total views, 1 views today