भारतीय सैन्यात सामील होण्याचा तरुणांनी केला निर्धार
कल्याण : १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना टिटवाळा येथील घोटसई गावातील तरुणांनी श्रद्धांजली वाहिली.
एकीकडे तरुणाई वेलेन्टाइन डे साजरा करण्यात मग्न असतांना कल्याण नजीक असलेल्या टिटवाळा येथील घोटसई गावातील तरुण मात्र पुलवामा हल्ल्यातील शहिदांचे स्मरण करत होते. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा येथे दहशतवाद्यानी केलेल्या भ्याड हल्ल्यात ४१ जवान शाहिद झाले होते. त्या सर्व जवानांना राजे शिव छत्रपती व शिवमुद्रा प्रतिष्टान तसेच ग्रामस्थ मंडळ घोटसई या मंडळातील नवतरुण युवकांनी मेणबत्ती प्रजवलीत करत, फुलं अर्पण करत श्रद्धांजली अर्पण केली. तसेच शहिदांप्रती आपल्या भावना व्यक्त करत इतर तरुणांनी देखील भारतीय सैन्यात सामील होण्याचा निर्धार केला.
569 total views, 1 views today