आरोग्य जपण्यासाठी व्हॅलेंटाइन दिवशी नागरिकांना झाडांचे वाटप

वायू प्रदूषणामुळे हृदयविकार रुग्णांमध्ये वाढ होत असल्यामुळे शुश्रूषा हार्ट केयर सेंटरने राबवला उपक्रम


नवी मुंबई,  ठाणे : कोणाविषयी वाटणारे प्रेम ही एक नैसर्गीक भावना असून या भावनेला खास बनविण्यासाठी जगभरामध्ये व्हॅलेंटाइन दिवस साजरा होत असतो. आजच्या दिवशी अनेकजण लग्न बंधनात अडकतात तर काहीजण आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर राहण्याचा निर्णय जाहीर करतात.  या दिवशी आपल्या प्रियजनांना अनेकजण भेटवस्तू देत असतात परंतु नेरुळ येथील शुश्रूषा हार्ट केयर सेन्टर व मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने नवी मुंबईतील नागरिकांना भेट म्हणून झाडांचे रोप दिले असून या प्रेमदिनादिवशी झाडांसोबत राहण्याचा सल्ला शुश्रूषा हार्ट केयरतर्फे देण्यात आला आहे. ही झाडे आपल्या परिसरात तसेच घराच्या आजूबाजूला असलेल्या मोकळ्या जागेत लावण्याचे आवाहन केले आहे. यावेळी हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकंना छोट्या रस्त्याच्या कडेला सरळ उंच जाणाऱ्या  झाडांचे वाटप करण्यात आले. याविषयी अधिक माहिती देताना शुश्रूषा हार्ट केयर सेन्टर व मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व हृदयशल्यविशारद डॉ. संजय तारळेकर म्हणाले, “आज व्हॅलेंटाइन दिवसाला खूपच महत्व आले आहे म्हणूनच आम्ही यादिवशी आपल्या आरोग्यात व मुख्यतः हृदयाच्या निरोगी आरोग्यासाठी  झाडांचे महत्व काय आहे हे नागरिकांना पटवून देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले होते. व्हॅलेंटाइन दिन व हृदय यांचे दृढ नाते आहे परंतु वाढत्या वायू प्रदूषणामुळे नागरिकांचे हृदयं कमजोर पडत असल्याचे समोर येत आहे त्यामुळे हे वायू प्रदूषण कमी करण्यासाठी  व्हॅलेंटाइन दिनी प्रत्येकाने एक तरी  झाड लावण्याची विनंती नेरुळ येथील शुश्रृषा हार्ट केयरतर्फे करण्यात आली आहे.  वाहने, उद्योगधंदे, कारखाने यातून बाहेर पडणारा धूर, तसेच शेतात पेंढा जाळण्यामुळे होणाऱ्या धुरामुळे मानवनिर्मित एरोसोल तयार होत असल्यामुळे येत्या काळात हृदयविकार वाढीस लागणार आहेत. आपण वायू प्रदूषणावर एका दिवसात मात करू शकत नाही परंतु ते कमी करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू शकतो व यातील पहिला प्रयत्न हा झाडे लावणे हा आहे, आपल्या घराच्या आजूबाजूला असलेल्या मोकळ्या जागेवर जर झाडे लावली तर त्यातून निर्मण होणारा ऑक्सिजन हा आपल्याला एक वरदानच ठरेल कारण भारतातील जी दहा शहरे प्रदुषणाच्या खाईत आहेत, त्यातील पाच शहरे महाराष्ट्रातील आहेत ही चिंतेची बाब आहे.” हवा प्रदूषणाने माणसाच्या श्वसन संस्थेला पहिला फटका बसतो त्यामुळे विविध प्रकारचे हृदयरोग जडण्यासाठी श्वसनातून शरीरात घुसणारी अस्वच्छ हवा कारणीभूत ठरते. वाहतूक प्रदूषणातून बाहेर पडणारी अल्ट्राफिनसारखी प्रदूषके रक्तवाहिन्यातील रक्त प्रवाहात अडथळा आणतात व त्यामुळेहृदयविकाराचा झटका येतो. शहरात हवेचे प्रदूषण भरमसाठ होत असते व तिथे वास्तव्य करणारे नागरिक हमखास उच्च रक्तदाबाचे बळी ठरत असून हृद्यविकाराचे रुग्ण वाढत असल्याची माहिती हृदयशल्यविशारद डॉ संजय तारळेकर यांनी दिली.

 600 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.