लाख बंधने घातली तरी ठाण्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होणारच

सकल मराठा समाज समन्वयक रमेश आंब्रे यांचा निर्धार

ठाणे : महाविकास आघाडीच्या सरकार मधील मंत्री कार्यक्रम घेतात,शपथविधी घेतात याला हजारोंची गर्दी होते त्यावर काही बंधने नाहीत फक्त शिवजयंतीला बंधने घातली जातात.कारण मराठा समाजाला एकत्र येऊ दयाचे नाही हा एकमेव हेतू सरकारचा आहे त्यामुळे सरकारने किती बंधने घातले तरी ठाण्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार असे प्रतिपादन सकल मराठा समाज समन्वयक रमेश आंब्रे यांनी केले आहे.
सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा, ठाणे यांच्या वतीने ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मैदान,तलावपाळी ठाणे येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. शिवजयंतीनिमित्त १८, १९,२० फेब्रुवारी रोजी, शिवछत्रपती व त्यांचे गड किल्ले यांवर आधारीत चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.तसेच ५० हजार मातीच्या दिव्यांपासून ३० बाय ४० फूटाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा मोझेक प्रोट्रेट साकारून त्यांची नोंद वर्ल्ड रिकॉर्ड इंडियामध्ये होणार आहे.तसेच १८ तारखेला मराठा समाजाचे २५ कार्यकर्ते शिवनेरी वरून ज्योत घेऊन ठाण्यात येणार आहेत असे रमेश आंब्रे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेतील सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जातील, तसेच तीन विजेत्यांना पुरस्कार दिले जातील.गट १- १ ते १५ वर्ष.गट २- १६ वर्ष वरील सर्व अशा दोन गटात ही स्पर्धा होणार आहे.सर्व इच्छुक स्पर्धकांनी आपले चित्र १६ फेब्रुवारी २०२१ रोजी किंवा त्या आधी सौ. स्नेहा गावकर ८८९८ ८५ ५९३०, संतोष पालांडे ८३५६९७९२९२, सुभाष एरंडे ७०२१४६११६७,संजय सूर्यवंशी ९९६९७३९१६९, समीर जाधव ९९६७ ४५ ७७८२,प्रवीण कदम ८६८९८४७८९९ या नंबर वर व्हॉट्सॲप करणे बंधनकारक असेल. ज्या स्पर्धकांचे चित्र प्राथमिक चाचणीत निवडले जातील, त्या सर्व स्पर्धकांचे चित्रे शिवजयंती उत्सवात प्रदर्शित केले जातील.
प्राथमिक चाचणीत निवड झालेल्या स्पर्धकांनी त्यांचे चित्र एफ – १, हाईड पार्क रेसिडेन्सी, शॉप नं. १, हिरानंदानी मेडोज, तुलसीधाम रोड, ठाणे (प.) ४००६१० या पत्यावर १७ फेब्रुवारी रोजी सुपूर्त करणे बंधनकारक असेल.

 529 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.