मुषक नियत्रंण कामगारांचे थकीत वेतन तातडीने द्या : नामदेव भगत

या कामगारांना पालिका प्रशासनाकडून अजून डिसेंबर २०२० आणि जानेवारी २०२१ चे वेतन मिळालेले नाही. वेतन कधी हातात पडेल याबाबत कंत्राटदार तसेच पालिका प्रशासनाकडून मुषक नियत्रंण कामगारांना कोणत्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर मिळालेले नाही.

नवी मुंबई : मुषक नियत्रंण कामगारांचे दोन महिन्याचे थकीत वेतन तातडीने देण्याविषयी पालिका प्रशासनाला तातडीने निर्देश देण्याची मागणी माजी सिडको संचालक व शिवसेनेचे माजी नगरसेवक नामदेव भगत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे मागणी केली आहे.
महापालिका प्रशासनात मुषक नियत्रंण कामगार वर्षानुवर्षे काम करत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून त्यांचे वेतन नेहमीच विलंबाने होत आहे. कोरोना काळात या कामगारांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता इमानेइतबारे काम केलेले आहे. या कामगारांची सेवा महापालिका प्रशासनाने कायम करणे तर लांबच राहीले, उलट वर्षानुवर्षे त्यांचे वेतन नेहमीच विलंबाने होत आहे. यामुळे कामगारांचे आर्थिक शोषण होत आहे. आज फेब्रुवारी महिन्याची १३ तारीख आहे. या कामगारांना पालिका प्रशासनाकडून अजून डिसेंबर २०२० आणि जानेवारी २०२१ चे वेतन मिळालेले नाही. वेतन कधी हातात पडेल याबाबत कंत्राटदार तसेच पालिका प्रशासन या मुषक नियत्रंण कामगारांना कोणत्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर देत नाही. महागाईच्या काळात तुटपुंज्या वेतनात मुषक कामगार आपला संसार चालविताना त्रस्त झालेला असतानाच त्यांचे वेतन विलंबाने होणे ही श्रीमंत महापालिकेसाठी नामुष्कीची बाब आहे. एकवेळ महापालिकेच्या एफडी मोडा, नगरसेवकांचे वेतन विलंबाने द्या, पण या गोरगरीब कामगारांचे वेतन वेळेवर झालेच पाहिजे. या मुषक नियत्रंण कामगारांचे डिसेंबर व जानेवारी या दोन महिन्याचे थकीत वेतन देण्याचे संबंधितांना निर्देश द्यावेत अशी मागणी नामदेव भगत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.

 371 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.