इंधन दरवाढ आणि वाढीव विजबिलांविरोधात कल्याणात मनसेचा मोर्चा

केंद्र आणि राज्य सरकारकडून नागरिकांची दिशाभूल – मनसेचा आरोप

कल्याण : पेट्रोल-डिझेलचे वाढलेले दर आणि वाढीव वीजबिलांविरोधात कल्याणात मनसेने कल्याण रेल्वे स्टेशन ते कल्याण तहसील कार्यलयावर मोर्चा काढला होता. या मोर्चात सरकारचा निषेध म्हणून काळे कपडे घालून शेकडो मनसैनिक सहभागी झाले होते.
मनसेच्या वतीने तहसील कार्यलयाबाहेर ठिय्या आंदोलन करत अन्यायकारक दरवाढ रद्द झालीच पाहीजे, केंद्र सरकार हाय हाय, राज्य सरकार हाय हाय, वीजबिल दरवाढ रद्द झालीच पाहीजे अशा जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर मनसेच्या शिष्टमंडळाने कल्याणचे तहसीलदारांची भेट घेत आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. दरम्यान महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या दोन नेत्यानी मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर झालेला डॅमेज कंट्रोल करण्यासाठी व पक्षात आलेली मरगळ झटकण्यासाठी स्थानिक नेत्यांकडून गेल्या आठवडाभरापासुन मेळावे आंदोलने हाती घेतली जात असल्याचं दिसून येत असून मनसे नेत्यांचा प्रयत्न कितपत यशस्वी होतो हे येत्या काळात दिसून येईल.
दरम्यान केंद्रात भाजपाला आणि राज्यात महाविकास आघाडीला नागरिकांनी सत्ता कशासाठी दिली आहे हा मोठा विषय असून हे पक्ष एकमेकांविरोधात केवळ मोर्चे काढून आंदोलने करत आहेत. तुम्हाला सत्ता केवळ मोर्चे आंदोलने करण्यासाठी दिली आहे का, सत्तेत बसून तुम्ही  निर्णय काय घेता असा सवाल खडा सवाल यावेळी मनसेचे माजी आमदार तथा महाराष्ट्र राज्य सरचिटणीस प्रकाश भोईर यांनी भाजपा आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना केला.   
या मोर्चात मनसेचे माजी आमदार तथा प्रदेश सरचिटणीस प्रकाश भोईर, महाराष्ट्र राज्य सचिव इरफान शेख, उर्मिला तांबे, प्रकाश भोईर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते

 401 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.