यिप्पी मध्ये सॉसी फ्लेव्हरची अनोखी चव! खास लाल रंगाच्या नूडल ब्लॉकसह नूडलच्या प्रकारांमध्ये अधिक विविधता सनफीस्ट यिप्पीचा इन्स्टंट नूडलची श्रेणी अधिक समृद्ध झाली आहे
मुंबई : सनफीस्ट यिप्पी ! जे वर्तुळाकार इन्स्टंट नूडल ब्लॉक्ससाठी आणि लांबसडक स्लर्पी नूडल्ससाठी ओळखले जाते, आणि जो अशा प्रकारचा अनुभव देणारा बाजारपेठेतील पहिलाच ब्रँड होता, त्यांनी आता आपल्या नूडल्सच्या श्रेणीमध्ये इन्स्टंट नूडलचा आणखी एक वेगळा प्रकार समाविष्ट केला आहे, जो आहे सनफीस्ट यिप्पी! सॉसी मसाला – यिप्पी अशा लोकांसाठी आहे ज्यांना इन्स्टंट नूडल्सवर थोडेसे टोमॅटो सॉस टाकून खायला आवडते. ग्राहकांच्या बाबतीतले संशोधन आणि पडताळा हे दर्शवतात की नूडल्स प्रिय असलेल्या भारतीय लोकांपैकी एका वर्गाला वास्तविकतः त्यांच्या इन्स्टंट नूडल्समध्ये थोडी चटपटीत चव असलेली आवडते. एकाच टेस्टमेकरमध्ये मसाल्याची चव आणि सॉसचा फ्लेव्हर एकत्र करून हा अनुभव सोयीस्कर करण्यात आला आहे. या पॅकमधला टेस्टमेकर नूडल्सची चव अगदी उत्तमपणे वाढवणारा असा असेल आणि इन्स्टंट नूडल्सना एक स्मूथ सॉसी फ्लेव्हर देईल. त्याशिवाय हे नूडल्स खास अशा लाल रंगाच्या नूडल ब्लॉकच्या स्वरूपात असल्याने ते दिसतीलही अगदी मजेदार.
हा ब्रँड Sunfeast ‘YiPPee! ची सॉसी गूगली’ हे कॅम्पेन देखील लाँच करणार आहे ज्यामध्ये ब्रँड अम्बॅसॅडर एमएस धोनी असेल आणि त्यासोबत सोशल मीडियावर इन्स्टंट नूडलच्या चाहत्यांसाठी एक स्पर्धासुद्धा असेल.
Link to the TVC: https://www.youtube.com/watch?v=OXG47FRwYYc&feature=youtu.be
सनफीस्ट यिप्पी सॉसी मसाला २ एसकेयूज मध्ये उपलब्ध आहे ज्यात १५ रुपयाचा ६५ ग्रॅमचा एक सिंगल पॅक आणि ५८ रुपयाचा २६० ग्रॅमचा फोर-इन-वन पॅक यांचा समावेश आहे. हे उत्पादन संपूर्ण भारतात सर्वसाधारण आणि आधुनिक विक्रीची ठिकाणे आणि महत्वाच्या ई-कॉमर्स माध्यमांद्वारे विक्रीसाठी उपलब्ध असेल.
393 total views, 1 views today