अशा आजारात एका ठरावीक वयानंतर शल्यचिकित्सा करणे कठीण जाते. या केसमध्ये पीडीएची साईज एक सेंटीमीटर होती व ही स्थिती फारच दुर्मिळ असते परंतु सुप्रियाच्या फुफुसांची स्थिती सकारात्मक असल्यामुळे आम्हाला ही शस्त्रक्रिया करणे सुलभ झाले.
नवी मुंबई : परभणी येथे रोंजंदारीवर काम करणाऱ्या बिरमोळे कुटुंबातील ११ वर्षाच्या मुलीला ( सुप्रिया नाव बदललेले आहे ) नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर येथे जीवनदान मिळाले आहे. सुप्रियाला जन्मजात हृदयविकार असल्यामुळे तिची हालचाल फारच कमी होती जास्त चालल्यावर अथवा काम केल्यावर तिला थकवा येत असे. सुप्रिया हिच्या घरातील परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे तिच्या आजारावर कोणतेही ठोस उपचार झाले नव्हते , गेल्या सहा महिन्यापासून तिची प्रकृती खालावत गेल्यामुळे बिरमोळे कुटुंबातील नातेवाईकांनी तिला नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर येथे भरती केले. नवी मुंबई व ठाण्यातील प्रसिद्ध बालहृदयविकार शल्यचिकित्सक डॉ भूषण चव्हाण यांच्या देखरेखीखाली सुप्रियाचे उपचार सुरु झाले. याविषयी अधिक माहिती देताना तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलचे बालहृदयविकार शल्यचिकित्सक डॉ भूषण चव्हाण म्हणले ” हृदयामधून निघणाऱ्या दोन्ही रक्त वाहिन्यांना जोडणारी एक रक्तवाहिनी असते. ही रक्तवाहिनी आईच्या पोटात असताना प्रत्येक अर्भकामध्ये असते, पण जन्म झाल्यानंतर ती बंद होते. ती बंद न झाल्यास उध्दभवणाऱ्या आजाराला पेटेंट डक्टस आरटेरिव्होसस (पीडीए )असे म्हणतात. सुप्रियाच्या वयाचा विचार करता आम्ही ओपन हार्ट सर्जरी न करता या डिव्हाइस प्रोसिजर करण्याचा निर्णय घेतला या मध्ये मध्ये जांघेमधून एक कॅथेटर हृदयाच्या आतपर्यंत पोहोचविण्यात येते व त्या कॅथेटरमार्फत एक छत्रीवजा डिव्हाइसने पीडीए बंद करण्यात येते. या डिव्हाइस प्रोसिजरसाठी अत्याधुनिक कॅथ लॅब यंत्रणेच्या मदतीने तिच्या पायाला छिद्र पाडून एक लांब नळीच्या साहाय्याने पीडीए डिव्हाइस हृदयात बसविण्यात आले.” या दुर्मिळ शल्यचिकित्सेविषयी बोलताना डॉ. भूषण चव्हाण सांगतात या सर्व प्रक्रियेमध्ये मला निसर्गाचे सुद्धा आभार मानावयाचे आहेत कारण जन्मजात हृदयरोग असूनही अकराव्या वर्षी आम्ही ही सर्जरी यशस्वी करू शकलो ही खरोखरच आश्चर्यकारक घटना आहे कारण अशा आजारात एका ठरावीक वयानंतर शल्यचिकित्सा करणे कठीण जाते. या केसमध्ये पीडीएची साईज एक सेंटीमीटर होती व ही स्थिती फारच दुर्मिळ असते परंतु सुप्रियाच्या फुफुसांची स्थिती सकारात्मक असल्यामुळे आम्हाला ही शस्त्रक्रिया करणे सुलभ झाले. आता सुप्रियाची तब्येत सुधारली असून तिला ४ दिवसात घरी पाठवण्यात आले आहे.जटील व वैद्यकीय क्षेत्रात आव्हान देणारी ही अवघड शल्यचिकित्सा तेरणा स्पेशालिटी मध्ये उपलब्ध असलेल्या वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे शक्य झाले अशा शल्यचिकित्सेसाठी बाल रुग्ण विभाग हा अद्ययावत असणे गरजेचं असते.वैद्यकीय क्षेत्रात अशा प्रकारची शल्यचिकित्सा फार दुर्मिळ व कठीण मानली जाते, डॉ. भूषण चव्हाण यांनी यापूर्वीही तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील अनेक छोट्या बालकांना जीवनदान दिले आहे. सुप्रियाची तब्येत खराब असल्यामुळे तिला शाळेत जाण्यासाठी खूप अडचणी येत होत्या परंतु आता ती नियमित शाळेत जाऊ शकेल अशी माहिती डॉ. भूषण चव्हाण यांनी दिली. ही शल्यचिकित्सा महात्मा ज्योतिबा फुले जन स्वास्थ्य योजनेअंतर्गत करण्यात आली आहे.
472 total views, 2 views today