कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणास सुरुवात करण्यात आली .आतापर्यंत ९७ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोनाची लस टोचून घेतली आहे.
कल्याण : कोरोना लसीकरण सुरू झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आल्यांनंतर आता महापालिका कर्मचाऱ्याना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. आज पालिका कर्मचाऱ्याच्या लसीकरणाची सुरुवात पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांना लसीकरण करून करण्यात आली तर पोलीस कर्मचाऱ्यांना लसीकरणास प्रोत्साहित करण्यासाठी पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनीही कोरोनाची लस घेतली.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणास सुरुवात करण्यात आली .आतापर्यंत ९७ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोनाची लस टोचून घेतली आहे. तर आता फ्रंटलाईन वर्कर असलेल्या महापालिकेच्या ५२०० आणि १२०० पोलीस कर्मचाऱ्यांना लसीकरण केले जात आहे. आज या मोहिमेत पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी लस टोचून घेतली यांनंतर त्यांनी कर्मचाऱ्यांना न घाबरता लसीकरणासाठी पुढे येण्याचे आवाहन केलं आहे.
यावेळी पालिकेच्या साथ रोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील, रुक्मिणीबाई रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ टिके, कल्याणचे एसीपी अनिल पोवार, डॉ. प्रशांत पाटील आदीजण उपस्थित होते.
505 total views, 1 views today