एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत संजय भोईर फाउंडेशनच्यावतीने रक्तदान, नेत्रचिकित्सा आणि आरोग्य शिबिराचे केले यशस्वी आयोजन


५०० रक्तदात्यांनी केले रक्तदान ; महिला आणि तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संजय भोईर फाउंडेशनच्या वतीने आज ७ फेब्रुवारी रोजी ढोकाळी येथील शरदचंद्र पवार इंडोअर स्टेडीयम येथे रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर आणि नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिबिराला भेट देवून उपक्रमाचे कौतुक केले. तसेच रक्तदात्यांशी संवाद साधला.
९ फेब्रुवारी ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये आरोग्य विषयक जनजागृती करण्याबरोबरच रक्तदात्यांची संख्या वाढावी याउद्देशाने जेष्ठ नगरसेवक तथा स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदर ठिकाणी उपस्थित राहून संजय भोईर यांनी आयोजित केलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच रक्तादात्यांशी संवाद साधत, आपण केलेले दान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचे सांगत तरूण पिढीने रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, जेष्ठ नगरसेवक देवराम भोईर, नगरसेविका उषा भोईर, माजिवडा – मानपाडा प्रभाग समिती अध्यक्ष भूषण भोईर, आदी मान्यवर उपस्थित होते.
लोकमान्य टीसा ब्लड बँकेच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिरासाठी सहकार्य केले. लायन्स क्लब ऑफ ठाणे नॉर्थच्या वतीने नेत्र चिकित्सा चे आयोजन केले. डॉ.शीतल थोटे यांनी आरोग्य शिबिरासाठी सहकार्य केले. सुमारे ५०० रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यामध्ये तरूण आणि महिला रक्तदात्यांची संख्या अधिक होते. विकेश संजय भोईर आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

 469 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.