निगेव्ह क्रिकेट अकॅडमीचा केला २१ धावांनी पराभव
ठाणे : सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरलेली मनाली दक्षिणी आणि रेश्मा नाईकच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर अजित घोष एकादश संघाने निगेव्ह क्रिकेट अकॅडमीचा २१ धावांनी पराभव करत डॉ राजेश मढवी स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित अर्जुन मढवी स्मृती महिला टी २० क्रिकेट लीग स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवला. सेंट्रल मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात अजित घोष एकादश संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांमध्ये ४ बाद १२४ धावा केल्या. सुरुवातीच्या पडझडीनंतर मनाली दक्षिणीने सात चौकार मारत नाबाद ४९ आणि रेश्मा नाईकने नाबाद ३२ धावा करत संघाच्या धावसंख्येला बळकटी दिली. त्यानंतर रेश्मा आणि इशा ओझाने प्रत्येकी तीन विकेट्स मिळवत अर्धा संघ कापून काढताना निगेव्ह क्रिकेट अकॅडमीला १०३ धावांवर रोखले. कविताने दोन,मनाली दक्षिणी आणि मंजरी गावडेने प्रत्येकी एक विकेट मिळवली.
539 total views, 3 views today