प्रदेशाध्यक्ष निवडीनंतर नाना पटोलेंनी जाहिर केली टिम

६ कार्याध्यक्ष १० उपाध्यांचा समावेश

मुंबई : राज्यात आगामी काळात काँग्रेसला चांगले दिवस आणण्याकरीता प्रदेश पक्षनेतृत्वात बदल करत माजी विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष पदी निवड होताच पटोले यांनी आपली नवी टिम तयार करत काँग्रेसने सहा कार्याध्यक्ष नियुक्त केले. यात मुंबईतून माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे आणि नसीम खान या दोघांची नियुक्ती करण्यात आली.
प्रदेश उपाध्यक्षपदी कोकण विभागातून माजी खासदार हुसेन दलवाई, माजी आमदार माणिक जगताप तर पुणे विभागातून रमेश बागवे, मोहन जोशी यांची नेमणूक करण्यात आली.
विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर चोवीस तासाच्या आत काँग्रेसने पटोले यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. काँग्रेस सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी शुक्रवारी काँग्रेस अध्यक्षांच्या मान्यतेने प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष, कार्यकारी अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या नावाची घोषणा केली. प्रदेश काँग्रेसला नवा चेहरा देताना काँग्रेसने सामाजिक आणि विभागीय समतोल साधला आहे. माणिकराव ठाकरे यांच्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद पुन्हा विदर्भाकडे आले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने विभागवार कार्याध्यक्ष नेमले होते. नवा प्रदेशाध्यक्ष नेमताना काँग्रेसने ही पद्धत कायम ठेवली आहे. कार्याध्यक्ष म्हणून विदर्भातून शिवाजीराव मोघे, मराठवाड्यातील बसवराज पाटील, उत्तर महाराष्ट्रातून कुणाल पाटील तर पश्चिम महाराष्ट्रातून आमदार प्रणिती शिंदे यांना संधी देण्यात आली आहे.
आज जाहीर झालेल्या १० उपाध्यक्षांमध्ये आमदार शिरीष मधुकरराव चौधरी, रणजित कांबळे, कैलाश गोरंटयाल, भा.ई. नगराळे, शरद आहेर, एम. एम. शेख यांचा समावेश आहे.
पक्षाच्या संसदीय मंडळात नाना पटोले, बाळासाहेब थोरात, शरद रणपिसे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, शिवराज पाटील, मुकुल वासनिक, रजनी पाटील, राजीव सातव, अविनाश पांडे, मिलिंद देवरा, विलास मुत्तेमवार, माणिकराव ठाकरे, भाई जगताप, के. सी. पाडवी, विजय वडेट्टीवार, नितीन राऊत, वर्षा गायकवाड, सुनील केदार,अस्लम शेख, यशोमती ठाकूर, अमित देशमुख, विश्वजित कदम, सतेज पाटील, वसंत पुरके, सुरेश धानोरकर, रणजित कांबळे, सुरेश शेट्टी, हुसेन दलवाई, अनंत गाडगीळ, बाबा सिद्दीकी, आशीष देशमुख, भालचंद्र मुणगेकर, मुझफ्फर हुसेन आणि मोहन जोशी यांचा समावेश करण्यात आला आहे.

 474 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.