चुलीवर भाकरी भाजत शिवसेनेने केला केंद्र सरकारचा निषेध

इंधन दरवाढी विरोधात शिवसेना आक्रमक

कल्याण :  इंधन आणि गॅस दरवाढीच्या मुद्द्यावर शिवसेनेकडून भाजप  सरकारवर चांगलेच तोंडसूख घेण्यात आले. एकीकडे पेट्रोल आणि डिझेलसह स्वयंपाकाच्या गॅसच्या दरवाढीचा निषेध करण्यासाठी शिवसेनेतर्फे कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी यावेळी कोळशावर चूल पेटवून त्यावर भाकरी भाजत केंद्रातील मोदी सरकारविरोधातील आपला राग व्यक्त केला.
आधीच इंधन दरवाढीमूळे लोकांचे कंबरडे मोडलेले असताना त्यात स्वयंपाकाच्या गॅसची भाववाढ करून केंद्राने सामान्य नागरिकांना आगीतून फुफाट्यात लोटल्याची प्रतिक्रिया कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केली. तर यावेळी केंद्राच्या इंधन दरांबाबतच्या धोरणांविरोधात, मोदी सरकारविरोधात शिवसेनेकडून जोरदार घोषणाबाजी करत यथेच्छ टिकाही करण्यात आली.
शिवसेनेच्या या आंदोलनात आमदार विश्वनाथ भोईर, यांच्यासह शिवसेनेचे नेते अल्ताफ शेख, रवी पाटील, शरद पाटील, अरविंद मोरे, रमेश जाधव, जयवंत भोईर,   परिवहन समिती सभापती मनोज चौधरी, महिला जिल्हा संघटक विजया पोटे यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

 421 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.