वाढीव वीजबिला विरोधात महावितरणच्या तेजश्री कार्यालयावर भाजपचे टाळे ठोको आंदोलन

जोपर्यंत सरकार नागरिकांना दिलासा देत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहण्याचा इशाराही भाजपतर्फे देण्यात आला.

कल्याण :  राज्यातील महाविकास आघाडी सरकारने वीज बिलांबाबत नागरिकांची फसवणूक केल्याचे सांगत कल्याण शहर भाजपतर्फे महावितरणच्या कल्याण पश्चिमेतील तेजश्री या मुख्य कार्यालयासमोर ‘टाळे ठोको’ आंदोलन करण्यात आले.
कोरोना काळात एकीकडे राज्यातील अनेकांच्या नोकऱ्या रोजगार गेले असताना राज्य सरकार मात्र जबरदस्तीने वीजबिल वसूली करत आहे. ही अत्यंत चुकीची भूमिका असून राज्य सरकारने त्वरित हा निर्णय मागे घेत जनसामान्यांना दिलासा देण्याची मागणी यावेळी भाजपच्या प्रेमनाथ म्हात्रे यांनी दिली. तसेच या प्रश्नावर जोपर्यंत सरकार नागरिकांना दिलासा देत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहण्याचा इशाराही भाजपतर्फे देण्यात आला.
यावेळी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तेजश्री कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्यात हस्तक्षेप करीत भाजप कार्यकर्त्यांना रोखून धरले. यावेळी भाजपकडून उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात भाजपचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 435 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.