स्वधा फाउंडेशन आणि आरएसपी युनिटतर्फे मेडिकल कॅम्प
कल्याण : सोशल अपफ्लिपमेंट आणि डेवलपमेंट फॉर हेल्थ ॲक्शन या संस्थेमार्फत संस्थेच्या मॅनेजिंग डायरेक्टर इव्हा अथाविया यांच्या माध्यमातून आणि आरएसपी युनिटच्या कल्पनेतून प्रादेशिक परिवहन अधिकारी तानाजी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आणि परिवहन अधिकारी दीपक शिंदे व आरएसपी कमांडर मणिलाल शिंपी यांच्या प्रमुख उपस्थितीत बत्तिसावा रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत कल्याण पश्चिमेतील स्वामी नारायण हॉल येथे रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी स्वधा फाउंडेशनतर्फे उपस्थित असलेल्या सर्वांचे मेडिकल चेकअप देखील करण्यात आले.
यावेळी वाहन चालक शिक्षक महाविद्यालयीन विद्यार्थी यांना वाहतुकीच्या नियमांविषयी माहिती देताना परिवहन अधिकारी तानाजी चव्हाण यांनी समाजातील सर्व बंधू-भगिनींनी वाहतुकीचे नियम पाहून आपल्या देशात अपघात कमी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले. तसेच दीपक शिंदे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की प्रत्येक नागरिकाने माझे शहर माझी जबाबदारी या संकल्पनेनुसार आपल्या कुटुंबासाठी आपल्या देशासाठी अपघात मुक्त देश करण्यासाठी वाहतुकीचे नियम आपल्या घरातून पाहण्यास सुरुवात करावी व ड्रायव्हिंग करताना नशा करणे किती घातक आहे याविषयी मार्गदर्शन केले.
आरएसपी कमांडर मणिलाल शिंपी यांनी रस्ता सुरक्षा अभियाना बाबत बोलताना सांगितले की आपल्या देशामध्ये रस्ता सुरक्षा साठी अभियान राबवावे लागते ही शोकांतिका आहे. यासाठी वाहन चालवताना नियम आणि संयम ठेवला तर आपल्यापासून यम लांब राहील म्हणून सर्व शिक्षक बंधूंना ऑनलाइन लेक्चर घेताना सुरुवातीला एक वाहतुकीचे नियम सांगावा असे आवाहन केले.
394 total views, 1 views today