देशात पोलिसांच्या भीतीने नियम पाळणे हे दुदैव – डॉ. गिरीश ओक

ठाणे : वाहतुकीचे नियम स्वतःच्या सुरक्षेसाठी असले तरी अनेकजण पोलिसांच्या भीतीपोटी नियम पाळतात. नियमांच्या अगोदर स्वतःची सुरक्षा महत्वाची आहे. परदेशात गेल्यावर आपण तिथले वाहूतुकीचे नियम स्वतःहुन पाळतो. पण  आपल्या देशात मात्र नियमाकडे दुर्लक्ष करतो.रस्त्यावर पोलीस दिसल्यावर पटकन हेल्मेट परिधान करतो आणि नंतर पुढे गेल्यावर लगेचच काढतो हा प्रकार दुर्दैवी  असल्याची खंत ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक यांनी व्यक्त केली. 

ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने ३२ व्या राष्ट्रीय रस्ते सुरक्षा अभियान कार्यक्रमा निमित्त महिला पुरुष बाईकरॅलीचे आयोजन केल होत. त्यावेळी बोलताना डॉ गिरीश ओक यांनी वाहतुकीचे नियम पाळणे किती महत्वाचे यावर भाष्य केली. यावेळी रॅलीला हिरवा झेंडा दाखवून डॉ. गिरीश ओक यांनी स्वतः रॅलीत सामील झाले होते.  शनिवारी सकाळी ८.३० च्या सुमारास रॅलीला सुरुवात झाली. मर्फी येथील आरटीओ कार्यालय येथून रॅलीला प्रारंभ झाला पुढे, नितीन जंक्शन, कोर्टनाका, तलावपाळी, तिनहात नाका, पासपोर्ट ऑफिस, उपवन, हिरानंदानी इस्टेट मार्गे मर्फी ऑफिस असा ३० किलोमीटरचा टप्पा या रॅलीने  पार केला. या रॅलीत सुमारे 200 दुचाकीस्वार सहभागी झाले असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वभंर शिंदे यांनी दिली.

.रस्ते सुरक्षा अभियान हे केवळ ठराविक कालावधीपुरते नसून ते आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे. प्रत्येकाने वाहतुक़ीचे नियम पाळूनच कायम वाहने चालविली पाहिजेत असा संदेश या रॅली दरम्यान देण्यात आला असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील म्हणाले.

 518 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.