अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समितीच्या अध्यक्षपदी शंकरराव आव्हाड यांची बिनविरोध निवड

वंजारी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संस्था गेली ३० वर्ष आहे प्रयत्नशील

कल्याण : वंजारी समाजाचा  सर्वांगीण विकास करून वंजारी समाजाला देशाच्या विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील करण्यासाठी गेली ३० वर्ष सातत्याने सामाजीक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच आरोग्य क्षेत्रात कार्य करणाऱ्या “अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती” या संस्थेची वार्षिक सर्वसाधरण सभा नुकतीच वंजारी भवन, कल्याण येथे संपन्न झाली. या सभेत माथाडी कामगार नेते व कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंकरराव आव्हाड यांची  सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. तर कार्याध्यक्षपदी ज्ञानेश्वर धात्रक आणि सरचिटणीसपदी अर्जुन डोमाडे व कोषाध्यक्षपदी रामनाथ दौंड यांची निवड करण्यात आली.
उपाध्यक्षपदी रमेश देशमुख, मोहन नाईक, डॉ.श्याम घुगे, संतोष पानसरे, आत्माराम फड यांची तर सहकार्याध्यपदी वसंत आव्हाड, प्रा.अर्जुन उगलमुगले, शशिकांत आंधळे आणि सहचिटणीसपदी अशोक घुगे, मोहन आव्हाड व सहकोषाध्यक्षपदी निवृत्ती घुगे, सुभाष घुगे यांची निवड झाली असून कार्यकारिणी सदस्य म्हणून दिपक पालवे, प्रमोद नागरे, संग्राम घुगे, विलास कुटे, ज्ञानेश्वर घुगे, दिगंबर पालवे, योगेश भाबड, सुनील आंधळे, वंदना सानप यांची निवड करण्यात आली असून सल्लागार म्हणून दत्ता घुगे, गंगाधर गरकळ, माधवराव आव्हाड, रामनाथ कराड, आबासाहेब कोंडे यांची सर्वानुमते निवड केली आहे. तर समितीचे अंतर्गत हिशेब तपासनीस म्हणून हेमंत दरगोडे यांची निवड करण्यात आली.

 404 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.