कल्याण सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी राजीव जोशी

नव्या कार्यकारिणीचा कालावधी २०२५ पर्यंत असून या काळात अनेक साहित्यिक उपक्रम तसेच विद्यार्थी व वाचकांसाठी योजना राबवण्यात येणार आहेत.

कल्याण  : १६५ वर्षांची समृद्ध परंपरा असलेल्या सार्वजनिक वाचनालयाची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी व लेखक राजीव जोशी यांची पुन्हा निवड करण्यात आली आहे. वाचन संस्कृती वाढवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.
सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडली. उपाध्यक्षपदी मिलिंद कुलकर्णी तर सरचिटणीसपदी भिकू बारस्कर यांची निवड झाली आहे. नवी कार्यकारिणीमध्ये विश्वस्त ऍड. सुरेश पटवर्धन, प्रशांत मुल्हेरकर, चिटणीस आशा जोशी व माधव डोळे, खजिनदार दिलीप कर्डेकर असणार आहेत.
नव्या कार्यकारिणीचा कालावधी २०२५ पर्यंत असून या काळात अनेक साहित्यिक उपक्रम तसेच विद्यार्थी व वाचकांसाठी योजना राबवण्यात येणार आहेत. सार्वजनिक वाचनालयामध्ये सुमारे पाऊण लाख एवढा पुस्तकांचा साठा असून साडेतीन हजार सभासद आहेत. त्याशिवाय हिंदी व इंग्रजी पुस्तकांसाठी स्वतंत्र ग्रंथालय असून अभ्यासकांसाठी संदर्भ ग्रंथालयदेखील आहे. हे सर्व विभाग आणखी सक्षम करण्यात येतील असे नवनिर्वाचित अध्यक्ष राजीव जोशी यांनी सांगितले.

 505 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.