जिल्हा शिक्षण प्रशिक्षण राहटोली ठाणे आणि समग्र शिक्षा शिक्षण विभाग पंचायत समिती भिवंडी तर्फे करण्यात आले होते आयोजन
कल्याण : किती वाचता यापेक्षा, काय वाचता? कसे वाचता? हे महत्त्वाचं आहे. मातृभाषेतून मुलांना शिकवले तरच त्यांची प्रगती उत्तम पद्धतीने होऊ शकते. भाषा हे व्यक्त होण्याचं माध्यम असल्याने ते सशक्त असावं असे मत भिवंडी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी नीलम पाटील यांनी व्यक्त केले.
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्ताने जिल्हा शिक्षण प्रशिक्षण राहटोली ठाणे आणि समग्र शिक्षा शिक्षण विभाग पंचायत समिती भिवंडी आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या कार्यक्रमात भाषेचा लोच्या या वादविवाद स्पर्धेचे अध्यक्ष संजय असवले शिक्षण विस्तार अधिकारी भिवंडी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पाडला. कार्यक्रमाला एकूण ७६ शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी ऑनलाइन उपस्थिती दर्शविली. या स्पर्धेत शिक्षकांनी यशस्वीरित्या सहभाग घेतला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक बाबासाहेब राऊत, व्दितीय क्रमांक रसिका पाटील, तृतीय क्रमांक सुनील पाटील, उत्तेजनार्थ क्रमांक जयश्री सोरटे, चंद्रकला काबूकर यांनी पटकावला.
मराठी भाषा सोपी भाषा आहे. संत महंतांनी अत्यंत प्रमाणभाषेमध्ये आपले लेखन केलेला आहे. बालपणापासूनच वाचण्याची आवड विद्यार्थ्यांना लावले पाहिजे. कलाकार कला सादर करताना भाषेच्या पलीकडे जाऊन आपल्या भावना व्यक्त करत असतात. पुस्तक वाचनाने माणसं प्रगल्भ होतात. असे मौलिक विचार कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय असवले यांनी मांडले.
अजय पाटील यांनी आपलं मत व्यक्त करताना सांगितले की ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटले आहे की अमृताचे पैजा जिंके अशी ही आपली मराठी भाषा, १ मे हा राजभाषा, दिन २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. गर्भसंस्कार हा आपल्या सोळा संस्कारांपैकी एक संस्कार असून गर्भामध्ये मुलावर योग्य भाषेचे संस्कार व्हायला पाहिजे. मुलगा घर, समाज, शाळा, मित्र, नातलग, आणि मीडिया याकडून भाषा शकत असतो. तेव्हा ती भाषा प्रगल्भ व्हायला पाहिजे संवर्धन व्हायला पाहिजे.
457 total views, 2 views today