शेतकऱ्यांच्या हिंसक आंदोलनाची सर्वोच्च न्यायालयाने दखल घ्यावी

कॅटची भारताच्या सरन्यायाधीशांना पत्राद्वारे विनंती

मुंबई : प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत झालेल्या शेतकऱ्यांच्या हिंसक आंदोलनाचा  कॉनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने निषेध केला असून या हिंसक आंदोलनाची सर्वोच्च न्यायालयाने दखल घ्यावी अशी विनंती करणारे पत्र भारताच्या सरन्यायाधीशांना पाठवले असल्याचे कॅटचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि ठाणे जिल्हा होलसेल व्यापारी वेल्फेयर संघटनेचे अध्यक्ष सुरेशभाई ठक्कर यांनी सांगितले.
सुरेशभाई ठक्कर म्हणाले, शेतकऱ्यांचे आंदोलन आता त्यांच्या मूळ मागण्यापासून भरकटले आहे. त्यांनी लाल किल्ल्याच्या महतीला काळीमा फासला आहे. देशातील कायदे आणि घटना त्यांनी पायदळी तुडवली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांना कॅटने पत्र पाठवले असून हे पत्र एक जनहित याचिका म्हणून दाखल करावे अशी विनंती केली आहे. याशिवाय देशाची अस्मिता, घटना यांचा योग्य तो मान कायम राखला जावा तसेच कायदेव्यवस्था सुरक्षित रहावी याकरता संबंधितांना सर्वोच्च न्यायालयाने निर्देश द्यावे अशी मागणी केली आहे. प्रजासत्ताक दिनामुळे दिल्लीतील बाजारपेठ बंद होत्या त्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान झाले नाही. पण असाच प्रसंग पुन्हा घडल्यास व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते अशी भीती सुरेशभाई ठक्कर यांनी व्यक्त केली.

 491 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.