यावेळी बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेची माहीती, रस्ते सुरक्षाविषयक संक्षिप्त सादरीकरण आणि संदेशफलकांद्वारे करण्यात आली जनजागृती
मुंबई : शिवसेना अंगीकृत शिव वाहतूक सेना आणि युवासेवा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंती आणि ३२ वे राज्य रस्ते सुरक्षा अभियान निमित्ताने मिशन सुखरूप जनजागृती उपक्रमांतर्गत सहार वाहतूक नियंत्रण कक्ष, अंधेरी येथे मुंबई वाहतूक पोलीसांना तसेच दुचाकी वाहनचालक नागरिकांना सुमारे ५०० हेल्मेट, परावर्तक जॅकेट आणि रस्ते सुरक्षा मार्गदर्शिका पुस्तिकेचे मोफत वितरण करण्यात आले.
सदर कार्यक्रमास मुंबई पोलीस दलातील निवृत्त एन्काऊंटर स्पेशलिस्ट अधिकारी प्रदीप शर्मा, युवासेना सरचिटणीस अमोल किर्तीकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी अभय देशपांडे, सहाय्यक पोलिसआयुक्त (वाहतूक) शंकुतला मेस्त्री, प्रभारी वाहतूक निरीक्षक संजय नार्वेकर, क्रिकेट प्रशिक्षक निलेश भोसले, मनोहर पांचाळ, सुभाष सावंत, विनय मोरे, युवासेना विभाग अधिकारी मयुर पांचाळ, मनोज जांगिड आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमस्थळी राज्य सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेची माहीती, रस्ते सुरक्षाविषयक संक्षिप्त सादरीकरण आणि संदेशफलकांद्वारे जनजागृती देखील करण्यात आली. सदर उपक्रमाचे आयोजन मोहन गोयल यांनी केले होते.
658 total views, 1 views today