शानू पठाण यांच्या रुपाने मुंब्रा भागाला प्रथमच विरोधी पक्षनेेतेपद मिळाले आहे.
ठाणे : ज्येष्ठ नगरसेवक अश्रफ (शानू ) पठाण यांनी ठाणे महानगर पालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा पदभार मावळत्या विरोधी पक्षनेत्या प्रमिलाताई केणी यांच्याकडून आज स्वीकारला.
प्रमिलाताई केणी यांचा कार्यकाळ संपत असल्याने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या आदेशाने तसेच गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली अशरफ शानू पठाण यांची ठाणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली असल्याचे शहराध्यक्ष माजी खासदार आनंद परांजपे यांनी गुरुवारी सायंकाळी जाहीर केले होते.
त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी शानू पठाण यांनी ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस तथा गटनेते नजीब मुल्ला, माजी विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांच्या उपस्थितीमध्ये प्रमिलाताई केणी यांच्याकडून विरोधी पक्षनेतेपदाचा पदभार स्वीकारला. शानू पठाण यांच्या रुपाने मुंब्रा भागाला प्रथमच विरोधी पक्षनेेतेपद मिळाले असल्याने मुंब्रा भागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठाणे पालिका मुख्यालयामध्ये प्रचंड गर्दी केली होती. तर, पदभार स्वीकारल्यानंतर शानू पठाण यांची मुंब्रा भागात मिरवणूकही काढण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा- मुंब्रा विधानसभाध्यक्ष तथा परिवहन समिती सदस्य शमीम खान, मुंब्रा येथील नगरसेवक राजन किणे, सिराज डोंगरे,अनिता किणे, अशरिन राऊत, बाबाजी पाटील, हाफ़िजा नाईक, सुनीता सातपुते, रुपाली गोटे, मोरेश्वर किणे, फरज़ाना शेख, हीरा पाटील, रेहान पीतलवाला, इमरान सुरमे, ज़फर नोमानी आदी उपस्थित होते.
547 total views, 2 views today