भाजपा शहर अध्यक्ष विवेक नार्वेकर यांनी दिले ५१ हजार रुपये
शहापूर (शामकांत पतंगराव) : श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे श्रीराम प्रभूंचे भव्य मंदिर निर्माण होत असून त्यासाठी निधी संकलन सुरू झाले आहे.
शहापूर शहरातही श्रीराम मंदिर निधी संकलन सुरू झाले असून भाजपचे शहापूर शहर अध्यक्ष विवेक नार्वेकर व नगरसेविका वैदेही नार्वेकर या दाम्पत्याने श्रीराम मंदिरासाठी सुमारे ५१ हजार रुपये देणगी दिली.
श्रीराम मंदिर निर्माण निधी संकलन समितीने विवेक नार्वेकर यांच्या घरी येऊन निधी संकलन केले.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भिवंडी जिल्हा संघटक ऍड. शंकर पाटील, वनवासी कल्याणचे संतोष काशीद, भिवंडी जिल्हा कार्यवाह अमेय आठवले, शंकरराव गोडबोले, सतिषशेठ गुजराथी, महेंद्र नवधरे,भाजपचे जिल्हा सरचिटणीस सुभाष हरड सर,विलास जोशी, राजेंद्र गांधी, विकास कुलकर्णी, डॉ. अजित पोतदार, भागवत तांदळे, सचिन व्यास, मोहन कारिया,सारंग जोशी आदी उपस्थित होते.
श्रीराम मंदिर निर्माण निधी संकलन १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी पर्यंत चालणार असून निधी संकलन अभियान शहापूर तालुक्यातील गावागावात जाणार आहे अशी माहिती समितीतर्फे देण्यात आली.
504 total views, 1 views today