शिवा संघटनेचा २५ वा वर्धापन दिन नांदेड मध्ये

रौप्यमहोत्सवी वर्ष जल्लोषात होणार साजरे

ठाणे : वीरशैव लिंगायत समाजाच्या न्यायहक्कासाठी कार्यरत असणाऱ्या, वीरशैव लिंगायत समाजाचे देशातील सर्वात प्रभावी व आक्रमक समजल्या जाणाऱ्या शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे दि 28 जानेवारी 2021 रोजी वर्धापन दिन असून यंदाचे शिवा संघटनेचे हे २५ वा वर्धापन दिन आहे. हे रौप्य महोत्सवी वर्ष मातोश्री मंगल कार्यालय, म्हाडा कॉलनी, जिल्हा नांदेड येथे दुपारी १२.३० वाजता मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे.
वीरशैव लिंगायत समाजाची वज्रमूठ तयार करून समाजाला एकसंध बनवून समाजाला त्यांचे हक्क व अधिकार मिळवून देण्यात तसेच वीरशैव लिंगायत समाजात अस्मिता, स्वाभिमान, एकसूत्रता निर्माण करण्यात देशात, महाराष्ट्र राज्यात शिवा संघटनेची भूमिका अत्यंत महत्वाची राहिली आहे. अश्या या शिवा संघटनेच्या रौप्यमहोत्सवी वर्धापन दिनाला वीरशैव लिंगायत समाज बांधवांनी, शिवा संघटनेच्या पदाधिकारी -कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी केले आहे.

 788 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.