खाशाबा जाधव पुरस्काराने बालारफि शेखचा गौरव

पुण्यात खाशाबा जाधव यांची ९६ वी जयंती साजरी


पुणे धु्रवतारा फाऊंडेशनच्या वतीने ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांची ९६ वी जयंती पुण्यात महाराष्ट्र क्रीडा दिन म्हणून साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र केसरी बालारफि शेख यांना दुसरा खाशााब जाधव पुरस्काराने गौरवण्यात आले.
१५ जानेवारी हा खाशाबा जाधव यांचा जन्मदिन महाराष्ट्रात राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने हनुमान कुस्ती आखाडाच्या सभागृहात ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या ९६ व्या जयंतीचा विशेष समारंभ साजरा झाला. यावेळी महाराष्ट्र केसरी बालारफि शेख यांना पेरिविंकल शाळेचे संस्थापक राजेंद्र बांदल यांच्या हस्ते खाशाबा जाधव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.  मानचिन्ह, पुस्तके, शाल, श्रीफळ व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप होते. याप्रसंगी हनुमान कुस्ती आखाडाचे प्रशिक्षक गणेश दांगट, ध्रुवतारा फाऊंडेशनचे अध्यक्ष व क्रीडालेखक संजय दुधाणे, गोरख वांजळे, मुळशी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद माझिरे, गणेश घुले, कुस्ती प्रशिक्षक रामसिंग, उमेश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. यापूर्वी पहिला पुरस्कार ऑलिम्पिकपटू मनोज पिंगळे यांना देण्यात आला होता.
देशाचे पहिले ऑलिम्पिदक पदक विजेते खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. यावेळी लेखक संजय दुधाणे यांनी खाशाबांच्या अनेक आठवणींला उजाळा दिला. प्रतिकुल परिस्थितीवर मात खाशाबांनी जिंकलेले पदकाची कथा त्यांनी उपस्थित कुस्तीगीरांना सांगितली. खाशाबांचे पदक हे आजही महाराष्ट्राचे एकमेव ऑलिम्पिक पदक असल्याची खंत व्यक्त करून संजय दुधाणे पुढे म्हणाले की, देशासाठी खेळताना खाशाबा जाधव यांनी जिंकलेले पदक आजही प्रेरणादायी आहे. त्यांची जयंती शासनाच्या क्रीडा खात्याने, कुस्ती परिषदेने साजरी केली पाहिजे.
खाशाबा जाधव हे नावातच एक चैतन्य आहे, आम्हा कुस्तीगीरांचे ते दैवत असल्याचे सांगून गणेश दांगट पुढे म्हणाले की,खाशाबांचा वारसदार महाराष्ट्रातून निर्माण झाला पाहिजे. तो प्रयत्न आम्ही सुरू केला आहे. खाशाबा जाधव हे कुस्तीतच नव्हे तर अ‍ॅथलेटिक्य, कबड्डी खेळातही आणि अभ्यासातही अव्वल होते अशी माहिती सांगत राजेंद्र बांदल पुढे म्हणाले की, हनुमान आखाड्यातील राष्ट्रीय विजेत्या खेळाडूना पेरिविंकल शाळा व हिमालय पतसंस्थेकडून मदत दिली जाईल.

 364 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.