तुर्तास मंत्रिपदाचा राजीनामा नाही

पाच तासाच्या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला धनंजय मुडेंना अभय देण्याचा निर्णय

मुंबईः एका महिलेनी केलेल्या आरोपामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत आले. त्यामुळे मंत्रिमंडळातून मुंडे यांची गच्छंती अटळ मानली जात असतानाच त्यांना अभयदान मिळाले आहे.
मुंडे यांच्यावरील आणि त्यांनी कथित महिलेने केलेल्या आरोपातील अनेक गोष्टींची कबुली दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज्य मंत्रिमंडळाच्या प्रतिमेवर बदनामीचे मळभ निर्माण झाले. तसेच भविष्यात याचा राजकिय तोटा किती होईल याबाबत अंदाज येत नव्हता. मात्र काल दिवसभरात रेणू शर्मा हिच्या विरोधात भाजपा कृष्णा हेगडे, मनसेचे मनिष धुरी आणि जेट एअरवेजचे रिजवान यांनी सदर महिलेने यापूर्वीही असे अनेक प्रकार केल्याची माहिती पुढे आणल्याने मुंडे यांना यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.
मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची पक्षाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या घरी रात्री उशीरा बैठक सुरु होवून तब्बल पाच तासानंतर ती पहाटे २ च्या सुमारास संपली. या बैठकीत संभावित मुंडे यांच्या रहाण्याने आणि न रहाण्याने पक्षाला कितपत फायदा-तोटा होईल, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला मतदारांवर परिणाम होईल का ? यासह अनेक प्रश्नांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानंतर याबाबत काही मुद्यांवर एकमत झाल्यानंतर सदरचा एकमताने ठरवित धनंजय मुंडे यांना तुर्तास अभयदान देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली.
त्यानुसार या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्ररित्या चौकशी करून त्याचा निर्णय घेण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. तो पर्यंत मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची गरज नसल्याचा निर्णय ही या बैठकीत घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

 291 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.