दक्षिण रायगडमध्ये जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर भाजपा झेंडा फडकवेल – माजी आमदार नरेंद्र पवार

दक्षिण रायगडमधील ग्रामपंचायत निवडणुकांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्याच्या भेटी घेत नरेंद्र पवार यांनी वाढवला उत्साह

रायगड : दक्षिण रायगडमधील अनेक गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूकांची रणधुमाळी सुरू आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवार उभे आहेत, त्या गावांमध्ये भेटी देत, कार्यकर्त्यांशी संवाद साधत भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी कार्यकर्ते व उमेदवारांमध्ये उत्साह निर्माण केला.
ग्रामपंचायत हा ग्रामविकासाचा महत्वाचा घटक आहे, परिवर्तन आणि गाव विकास करण्याच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी ताकदीने निवडणूका लढत आहे. ज्या ठिकाणी कार्यकर्ते लढत आहेत त्यांना भेटून प्रोत्साहन देणे आणि विश्वास देणे महत्वाचे असते. या निवडणूकांच्या निमित्ताने दक्षिण रायगडमधील निडी, कोडगाव, ऐनघर, पलस, वरवटणे , माळसई, तळवली, चिंचवली तर्फ दिवाळी, खारपटी, घोसाळे, रोठ बुद्रुक, वाशी, दिघी आदी गावांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. प्रचार यात्रा व बैठकांमध्येही सहभागी झाले व दक्षिण रायगड ग्रामपंचायतींमध्ये भाजपा मुसंडी मारेल असा विश्वास दक्षिण रायगड भाजपा प्रभारी तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केला.
या दरम्यान पेण विधानसभा मतदार संघाचे आमदार रवीशेट पाटील, दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मापारा, युवामोर्चा जिल्हा अध्यक्ष अमित घाग, रोहा तालुका अध्यक्ष सोपान जांभेकर, श्रीवर्धन तालुका अध्यक्ष प्रशांत शिंदे, उपाध्यक्ष शिवाजी जाधव, कृष्णा बामणे, सुधागड तालुका अध्यक्ष दादा घोसाळकर, दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष ॲड महेश मोहिते, सरचिटणीस सतीश धारप व मिलिंद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राजेश मापारा व वैकुंठ पाटील, युवामोर्चा जिल्हा अध्यक्ष अमित घाग, रोहा तालुका अनुसूचित जमाती मोर्चा तालुकाध्यक्ष निमेश वाघमारे, श्रीवर्धन तालुकाध्यक्ष प्रशांत शिंदे, रोहा तालुकाध्यक्ष सोपान जांभेकर, पेण तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, तानाजी देशमुख, लक्ष्मण जांभले, मारुती देवरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 327 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.