गुणवत्ता शोध निवड समितीवर डॉ. चंद्रजित जाधव, अ‍ॅड. गोविंद शर्मा

महाराष्ट्रासह छत्तीसगढ, गुजरात, गोवा, दादरा-नगर हवेली पाच राज्यातील गुणवंत खो-खो खेळाडूंचा शोध घेण्याचे काम ही समिती करेल.

दिल्ली : केंद्र शासनाच्या खेलो इंडिया अभियानांतर्गत पश्‍चिम विभागिय गुणवत्ता शोध निवड समितीवर खो-खो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजित जाधव व खो-खो महासंघाचे सदस्य आणि राज्य खो-खो संघटनेचे सचिव अ‍ॅड. गोविंद शर्मा यांची नियुक्ती केली आहे. महाराष्ट्रासह छत्तीसगढ, गुजरात, गोवा, दादरा-नगर हवेली पाच राज्यातील गुणवंत खो-खो खेळाडूंचा शोध घेण्याचे काम ही समिती करेल.
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीयस्तरावरील खेळाडू घडविण्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयातर्फे खेलो इंडिया अभियान गेली तीन वर्षे देशभरात सुरु आहे. राष्ट्रीयस्तरावरील स्पर्धांचे आयोजन करणे आणि देशातील गुणवंत खेळाडूंची निवड करुन त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यादृष्टीने क्रीडा विभागाकडून पावले उचलण्यात आली आहेत. जास्तीत जास्त गुणवंत खेळाडूंना याचा लाभ व्हावा यासाठी विभागिय समित्या तयार केलेल्या आहेत.
महाराष्ट्र, छत्तीसगढ, गुजरात, गोवा, दादरा-नगर हवेली या पाच राज्याचा समावेश असलेल्या पश्‍चिम विभागासाठी शोध समिती तयार केली आहे. या समितीवर महाराष्ट्रातील डॉ. चंद्रजित जाधव, अ‍ॅड. गोविंद शर्मा यांची नियुक्ती झाली आहे. तळागाळात जाऊन तेथील गुणवान खेळाडून शोधण्याची जबाबदारी या समितीवर आहे. यासाठी सरकारतर्फे या समितीतील सन्माननीय व्यक्तींना प्रवास, निवास आदि सुवधा उपलब्ध करून देणार आहे.
ही निवड झाल्याबद्दल खो-खोचे आधारस्तंभ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खो-खो महासंघाचे अध्यक्ष सुधांशु मित्तल, सचिव महेंद्रसिंग त्यागी, राज्य खो-खो संघटनेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, कार्याध्यक्ष सचिन गोडबोल, राज्य खो-खो संघटनेचे उपाध्यक्ष कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड, महेश गादेकर, अभिमन्यु पवार, अशोक पितळे, विजय मोरे, वैशाली लोंढे, ग्रीष्मा पाटील-पोटे, खजिनदार अ‍ॅड. अरुण देशमुख, माजी सचिव संदिप तावडे, तुषार सुर्वे यांच्यासह महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी अभिनंदन केले.

 490 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.