शारीरीक शिक्षण शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावणार

आमदार निरंजन डावखरे यांचे ठाणे जिल्हा युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाला आश्वासन

कल्याण : ठाणे जिल्हा युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने शारीरिक शिक्षण व शिक्षक प्रमुख प्रश्नांसंबधी निवेदन अंतर्गत संदीप मनोरे आणि तायाप्पा शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण पदवीधर मतदार संघाचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. मुंबई विद्यापीठ शारीरीक शिक्षण संचालक पद आणि शालेय स्तरावर शाळा तेथे शारीरीक शिक्षण शिक्षक असावा, क्रीडा धोरण २०१२ संचमान्यता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये शारीरीक शिक्षण विषयाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासंबंधी चर्चा करून निवेदन देण्यात आले.
कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शारीरीक शिक्षण विषय आणि शारीरीक शिक्षण शिक्षक यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू असे सांगितले. तसेच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यासोबत लवकरच सहविचार सभेचे आयोजन करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी मुंबई विभाग युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे सचिव प्रदीप मस्तूद, ठाणे जिल्हा युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे सचिव डॉ. सुनिल पवार, कार्याध्यक्ष अमोलकुमार वाघमारे, नवी मुंबई युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष जितेंद्र म्हात्रे, मुंबई विभाग संपर्क प्रमुख भालचंद्र सावर्डेकर, मुंबई विभाग सदस्य शरद मगर, स्वप्निल शेट्टी, संतोष मुंढे, खजिनदार वाल्मीक नाईक, भिवंडी तालुका युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे सचिव छत्रपती घोटकर, सदस्य भावेश गुळवी आदीजण उपस्थित होते.

 502 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.