काही लोकांनी आज ना उद्या देयके माफ होतील या आशेवर देयके अदा केली नाहीत. याचा काहींनी गैरफायदा घेतला. अनेक दिवसांपासून शहापूर मध्ये काही ठकसेन वीज देयके कमी करून देतो असे सांगुन ग्राहकांना फसवणूक करून त्यांच्याकडे पैसे मागण्याच्या तक्रारी शहापूर कार्यालयात येत होत्या.
शहापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या लॉकडाऊन काळात अनेकांनी वीज देयके अदा केली नव्हती.महाराष्ट्र शासन वीज देयके माफ करेल या आशेवर थकीत झालेली देयके कमी करून देतो असे सांगून ग्राहकांकडून पैसे उकळणारा ठकसेन महावितरण अधिकाऱ्यांच्या जाळ्यात सापडला असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या लॉकडाऊनपासून जुलै २०२० पर्यंत रीडिंग बंद असल्याने ग्राहकांना जुलै मध्ये एकत्रित ४ महिन्याचे देयक पाठविले होते,हे देयक रीडिंग प्रमाणे बरोबर असून ते हप्त्या हप्त्याने भरण्याची मुभा ग्राहकांना महावितरण कडून देण्यात आली होती. त्या प्रमाणे अनेक ग्राहकांनी टप्या टप्यात देयके अदा केली परंतु काही लोकांनी आज ना उद्या देयके माफ होतील या आशेवर देयके अदा केली नाहीत. याचा काहींनी गैरफायदा घेतला. अनेक दिवसांपासून शहापूर मध्ये काही ठकसेन वीज देयके कमी करून देतो असे सांगुन ग्राहकांना फसवणूक करून त्यांच्याकडे पैसे मागण्याच्या तक्रारी शहापूर कार्यालयात येत होत्या. याची खातरजमा करून घेत शहापूर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता अविनाश कटकवार यांनी सर्व कर्मचारी व जनमित्र यांना सतर्क केले व ग्राहकांना या बाबत कल्पना देण्याचे सांगितले. त्यामुळे मंगळवारी अनिरुद्ध अपार्टमेंट, आसनगाव येथील ग्राहकाला समोरून फोन आला की तुमचे वीज बिल कमी केले आहे ते मी घेऊन येत आहे. असे समजल्यावर या ग्राहकाने महावितरणच्या कर्मचाऱ्यांना फोन करून बोलावून घेतले व बील कमी केले असे खोटे सांगून पैसे लुबाडणाऱ्या अरुण कृष्णा शिर्के या ठकसेनास पकडून त्याला शहापूर पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.
या कारवाईत शहापूर उपविभागाचे उप कार्यकारी अभियंता अविनाश कटकवार, सहाय्यक अभियंता चेतन वाघ, सहाय्यक लेखापाल विशाल सानप, लाईनमन पंकज नाईक, सुरक्षा रक्षक गणेश धसाडे आदी सहभागी झाले होते.
ग्राहकांनी अशा भूलथापांना बळी पडू नये कोणी व्यक्तीने आपणास बील कमी करून देण्याचे आमिष दाखवल्यास त्या व्यक्तीची तक्रार जवळच्या महावितरण कार्यालयात करावी तसेच आपले चालू वीज देयक योग्य आहे की नाही हे जवळच्या महावितरण कार्यालयात जाऊन समजून घ्या व देयक लवकरात लवकर वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करा.
-अविनाश कटकवार, उपकार्यकारी अभियंता, शहापूर उपविभाग, शहापूर.
525 total views, 2 views today