महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुरस्कृत प्रभादेवी प्रीमियर लीग शिवाजी पार्कमध्ये रंगणार, यू ट्यूबवर थेट प्रेक्षपण, टेनिस क्रिकेटमधील मॉडेल खेळाडू खेळणार
मुंबई : प्रभादेवी स्पोर्ट क्लबच्या वतीने यशवंत किल्लेदार (विभाग अध्यक्ष -माहीम विधानसभा )यांच्या मार्गदर्शना खाली शिवाजी पार्क मैदानात होणारी प्रभादेवी प्रीमियर लीग स्पर्धा याचे थेट प्रक्षेपण (YouTube – live) दाखविण्यात येणार आहे. टेनिस क्रिकेट जगतातील आयकॉन खेळाडू या स्पर्धेत खेळणार असून क्रीडा रसिकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुरस्कृत असणारी ही स्पर्धा शनिवार, ९ जानेवारी रोजी संपन्न होणार आहे.
प्रभादेवी स्पोर्टस् क्लबच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून क्रिकेट फॉर युनिटी या स्लोगणखाली क्रिकेट स्पर्धेचा सोहळा TennisCricket.in च्या माध्यमातून youTube live वर ही स्पर्धा थेट प्रेक्षपित करण्यात येणार असल्याने शिवाजी पार्कमधील टेनिसचा महासंग्राम अनेकांना पाहण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या स्पर्धेत ८ संघांचा सहभाग असून प्रत्येक संघात प्रसिद्ध असणाऱ्या स्टार खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. शिवाजी पार्कचे क्रिकेट आणि प्रेक्षकांचे जवळचे नाते असल्याने या स्पर्धेला सुरवातीपासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
516 total views, 1 views today