जगामध्ये फक्त २० शस्त्रक्रिया झाल्याची वैद्यकीय अभिलेखात नोंद
मुंबई : नेरुळ येथे राहणाऱ्या कृष्णकांत अय्यर ( वय ६५ नाव बदललेले आहे ) हे दीड महिन्यापूर्वी प्रोस्टेटच्या सौम्य वाढीच्या तसेच मूत्रमार्गाची तक्रार घेऊन नेरुळ नवी मुंबई येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरमध्ये दाखल झाले होते.सखोल वैद्यकीय तपासणी नंतर कृष्णकांत यांच्या डाव्या बाजूच्या किडनीच्या वर असलेल्या एड्रेनल ग्रंथीला ११ सेंटीमीटर व्यासाचा ट्यूमर आढळून आला. या प्रकारच्या ट्यूमरला एड्रेनल एंजियोमायोलिपोमा असे नाव असून हा ट्यूमर फारच दुर्मिळ असून अशा प्रकारचे फक्त २० रुग्ण याआधी जगामध्ये आढळून आले आहेत.अशा रुग्णांमध्ये अनियंत्रित उच्च रक्तदाब असल्यामुळे आणि बायोकेमेस्ट्री फिओक्रोमोसाइटोमा नावाच्या अतिशय घातक रोगाची लक्षणे असल्यामुळे हा ट्युमर काढताना मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. कृष्णकांत यांचे वय पाहता ही शल्यचिकित्सा फारच धोकादायक होती. याविषयी अधिक माहिती देताना तसेच या रुग्णावर शस्त्रक्रिया करणारे तेरणा स्पेशॅलिटी हॉस्पिटलचे युरोलॉजी आणि अॅन्ड्रोलॉजी सल्लागार, डॉ. निशांत कठाळे म्हणाले, ” एंजियोमायोलिपोमा हा बेनाइंगच्या जातकुळीतील ट्युमर असून हा गुळगुळीत स्नायू पेशी, जाड-भिंतींच्या रक्तवाहिन्या आणि चरबीयुक्त टीशूमध्ये आढळून येतो. एंजियोमायोलाइपोमा सामान्यत: मूत्रपिंडात आणि यकृताच्या अतिरिक्त-भागात आढळून येतो परंतु आंत्रावरणाच्या पाठीमागच्या बाजूला स्पीन म्हणजेच प्लीहामध्ये हाडे, फुफ्फुस; अंडाशय किडनीच्या ग्रंथीला आढळणारा ट्यूमर अत्यंत दुर्मिळ आहे. हा दुर्मिळ ट्युमर कृष्णकांत यांच्या डाव्या मूत्रपिंडाच्यावर, मोठ्या आतड्यांमागे होता, एड्रेनल ग्रंथीला तसेच स्वादुपिंड आणि प्लीहाला चिकटला असल्यामुळे तो काढणे हे एक वैद्यकीय आव्हानच होते व हे आव्हान तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलच्या निष्णांत डॉक्टरांच्या टीमने सहज पार केले. भारतीय वैद्यकीय अभिलेखानुसार २००७ आणि २०१४ मध्ये अनुक्रमे २ रुग्णांना असाच ट्यूमर आढळला असून २०२० मध्ये तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आढळलेले हे तिसरे रुग्ण आहे तसेच जगामध्ये फक्त २० रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या आहेत. या रुग्णाचे ऑपरेशन झाल्यानंतर त्याना दोन दिवस आयसीयु मध्ये ठेवले होते व त्यानंतर पाच दिवसांनी त्याना घरी सोडण्यात आले. अशा प्रकारच्या कठीण आणि दुर्मिळ शस्त्रक्रिया नियमितपणे नवी मुंबईतील तेरणा स्पेशॅलिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये केल्या जात असून कोरोना संक्रमण काळात किडनी, यकृत व ह्रदय संबंधित अनेक शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत.” कोरोना संक्रमण काळात अनेक नागरिकांनी उपचार व शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या व त्यामुळे अनेक आरोग्याच्या तक्रारी वाढल्या होत्या परंतु तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरमध्ये कोरोना असलेल्या व कोरोना नसलेल्या रुग्णांसाठी वेगळे वार्ड तयार केले होते व या काळातही तेरणा हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत परंतु आजही अनेक नागरिक कोरोनाच्या भीतीने घराबाहेर पडत नाहीत व त्यामुळे शरीरातील आजार वाढून अनेक गंभीर तक्रारी निर्माण होत आहेत अशी माहिती तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलचे युरोलॉजी आणि अॅन्ड्रोलॉजी सल्लागार, डॉ. निशांत कठाळे यांनी दिली.
395 total views, 1 views today