तलाठी संघाच्या अध्यक्षपदी राकेश घोलप यांची निवड

घोलप हे मुरबाड तालुक्यातील धसई गावचे रहिवासी असून किन्हवली परिसरातील नागरिकांना शेती व महसूलसंबंधी समस्यांवर चांगली सेवा देत असतानाच तलाठी संघाचे कार्याध्यक्ष, सरचिटणीस अशी पदे त्यांनी सांभाळली आहेत

शहापूर : महाराष्ट्र राज्य तलाठी संघ शहापूर तालुका शाखेची सभा शहापूर तलाठी भवनात संपन्न झाली. यावेळी नवी कार्यकारिणी जाहीर झाली असून किन्हवली सजेचे काम पाहणारे तरुण तलाठी राकेश घोलप यांची तालुकाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. घोलप हे मुरबाड तालुक्यातील धसई गावचे रहिवासी असून किन्हवली परिसरातील नागरिकांना शेती व महसूलसंबंधी समस्यांवर चांगली सेवा देत असतानाच तलाठी संघाचे कार्याध्यक्ष, सरचिटणीस अशी पदे त्यांनी सांभाळली आहेत. शहापूर तालुक्यातील ३१ तलाठी सजांचे काम पाहणाऱ्या २६ तलाठ्यांचे नेतृत्व करुन तालुक्यातील तलाठ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ११ जणांची नवी कार्यकारिणी यावेळी निवडण्यात आली. त्यात राकेश घोलप यांना अध्यक्ष म्हणून तर कार्याध्यक्षपदी एन.एच.निकम, उपाध्यक्षपदी गणेश विशे, सचिवपदी डी.बारेला , खजिनदार म्हणून लक्ष्मण केंद्रे, संघटकपदी संदिप चौधरी व रुपेश मेरत, प्रविण जाधव, बुधाजी हिंदोळा, शंकर डामसे, के.एस.लोणारे यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून व उज्ज्वला दराणे यांची भिवंडी उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. सदर सभेस महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे अप्पर सरचिटणीस अशोक दूधसागरे, ठाणे जिल्हा अध्यक्ष संतोष आगिवले, जिल्हा उपाध्यक्ष भारती शेट्टे, भिवंडी तालुका अध्यक्ष कामडी उपस्थित होते.

 486 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.