ठाणे जिल्ह्यातील पथकांनी आपले अर्ज ३१ जानेवारीपर्यंत जिल्हा माहिती कार्यालयात पाठवण्याचे प्रशासनाचे आवाहन
ठाणे : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचविण्याच्या अनुषंगाने लोककला, पथनाट्याद्वारे करण्याकरिता (उदाहरणार्थ गण-गवळण, अभंग, पोवाडे, वगनाट्य, बहुरुपी, भारुड इ.) लोककला,पथनाट्य पथकांची निवडसूची तयार करण्यात येत आहे. तरी याबाबत सदर क्षेत्रातील अनुभवी संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
पथकाला विविध विषयांवर (शासकीय योजनांसह) कार्यक्रम,पथनाट्य करण्याचा अनुभव असावा. पथक किमान दहा जणांचे असावे. यामध्ये स्त्री-पुरुष, वादक यांचा समावेश असावा. लोककला,पथनाट्य पथक ज्या जिल्ह्यातील असेल त्याच जिल्ह्यातून अर्ज दाखल करावा. केंद्र सरकारच्या गीत व नाट्य विभागाकडे नॉंदणीकृत असल्यास प्राधान्य.संस्थेकडे स्वत:ची ध्वनीक्षेपण यंत्रणा असणे अपेक्षित आहे.
इच्छुक संस्थांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाशी संपर्क साधून अर्जाचा नमुना व माहितीपत्रक प्राप्त करून घ्यावा. अर्जाचा नमुना व माहितीपत्रक www.maharashtra.gov.in आणि dgipr.maharashtra.gov.in या वेबसाईटवरही उपलब्ध आहे.
विहीत नमुन्यातील अर्ज भरुन संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांना १ ते २१ जानेवारीपर्यंत मिळतील अशा बेताने पाठवावेत. मुंबई आणि उपनगरातील पथकांनी त्यांचे अर्ज उपसंचालक(माहिती), विभागीय माहिती कार्यालय, तिसरा मजला, कोकण भवन, नवी मुंबई येथे पाठवावेत.
तसेच विहित नमुन्यातील अर्ज भरुन जिल्हा माहिती कार्यालय,ठाणे, स्टेट बँक ऑफ इंडिया इमारतीवर,पहिला मजला,जिल्हाधिकारी आवार,कोर्ट नाका,ठाणे (प) येथे २१ जानेवारीपर्यंत पाठवावे असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे यांनी केले आहे.
507 total views, 1 views today