ठाणे महानगरपालिकेने केली २५०० व्यक्तींवर कारवाई
ठाणे : ठाणे महानगरपालिका हद्दीत सार्वजनिक ठिकाणी, शासकीय कार्यालये, खासगी कार्यालये तसेच मार्केट या ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या २५०० व्यक्तींविरूद्ध आतापर्यंत दंडात्मक करण्यात आली असून १२ लाख ५० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या आदेशानुसार सदरची कारवाई करण्यात आली.
सद्यस्थितीत कोरोनाचा संसर्ग सुरू असून देखील शहरात सार्वजनिक ठिकाणी, शासकीय कार्यालये तसेच खासगी कार्यालये या ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढतच आहे. महापालिका आयुक्त डॉ. विपीन यांच्या आदेशानुसार महापालिका हद्दीतील विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांसह ठाणे महानगरपालिकेच्यावतीने ही कारवाई करण्यात आहे.
ठाणे महापालिकेच्या नऊ प्रभाग समितीमध्ये आतापर्यंत शहरात विना मास्क फिरणाऱ्या २५०० व्यक्तींविरूद्ध कारवाई करून दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये नौपाडा प्रभाग समिती ४६८, वर्तकनगर प्रभाग समिती ३५४, माजिवडा मानपाडा प्रभाग समिती ३४९, उथळसर प्रभाग समिती २८०, कळवा प्रभाग समिती २४५, मुंब्रा प्रभाग समिती १८५, लोकमान्यनगर प्रभाग समिती २४०, वागळे प्रभाग समिती १८४, आणि दिवा प्रभाग समिती १९५ व्यक्तींविरूद्ध कारवाई करून एकूण १२ लाख ५० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
यापुढे देखील ठाणे महानगरपालिका हद्दीत सार्वजनिक ठिकाणी, शासकीय कार्यालये तसेच खासगी कार्यालये तसेच मार्केट या ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींविरूद्ध दंडात्मक करण्यात येणार असून प्रत्येक नागरिकांकडून ५०० रुपयांपर्यंत दंड वसूल करण्यात येत आहे.
467 total views, 2 views today