प्लास्टिक टू फ्युअल प्रकल्पातून तेलाची यशस्वी निर्मिती

बाजारात कुठलीही रिसेल व्हॅल्यू नसलेले प्लास्टिक वापरुन इंधन तयार करण्यासाठी मंगळवारी चाचणी घेण्यात आली असता सदर चाचणी यशस्वी झाली आहे. त्यामुळे या प्रकल्पातून इंधन निर्मिती करण्यासाठी महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड यांचेकडे महानगरपालिकेने परवानगी मिळण्यासाठी अर्ज केलेला आहे.

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि रुद्र इन्व्हारमेंन्ट सोलुशन लिमीटेड यांच्या संयुक्त विद्यमाने सीएसआर फंडातून बारावे येथे सुरु करण्यात आलेल्या प्लास्टिक टू फ्युअल प्रकल्पातून ८५ लिटर इंधन तेलाची यशस्वी निर्मिती करण्यात आली आहे. या प्रकल्पात बाजारात कुठलीही रिसेल व्हॅल्यू नसलेले प्लास्टिक वापरुन इंधन तयार करण्यासाठी मंगळवारी चाचणी घेण्यात आली असता सदर चाचणी यशस्वी झाली आहे. त्यामुळे या प्रकल्पातून इंधन निर्मिती करण्यासाठी महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड यांचेकडे महानगरपालिकेने परवानगी मिळण्यासाठी अर्ज केलेला आहे.
हा प्रकल्प रुद्र इन्व्हारमेंन्ट सोलुशन लिमीटेड आणि महानगरपालिका एकत्रीतरित्या राबवित असून यासाठी लागणारी जागा महानगरपालिकेने पुरविलेली आहे. या प्रकल्पाची क्षमता १ टन प्लास्टिकची असून त्यातून सुमारे ५०० लिटर इंधन तेल तयार होऊ शकते. सदर इंधन तेल बॉयलरसाठी वापरता येणार असून, वाहनांमध्ये त्याचा वापर इंधन म्हणून होऊ शकते का, याची चाचणी सुरु आहे.
    महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या सकारात्मक दृष्टिकोनातून आणि मार्गदर्शनाखाली तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त रामदास कोकरे व उप अभियंता मिलिंद गायकवाड यांच्या अथक प्रयत्नातून या कामाला गती मिळत असून कचऱ्यातील रिसेल व्हॅल्यू नसलेल्या व पर्यावरणाला हानीकारक असलेल्या प्लास्टिकचा असाही सदुपयोग यामध्ये होत आहे.

 391 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.