चैन स्नॅचिंग करणाऱ्या तिघांना टिळकनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या


२ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल केला हस्तगत

कल्याण : टिळक नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत चैन स्नेचिंग करणाऱ्या ३ आरोपींना अटक करण्यात टिळक नगर पोलिसांना यश आले असून त्याच्याकडून २ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. विशाल सिद्धार्थ वाघ, शंकर उर्फ शंखु संतोष जाधव आणि गजानन उर्फ भोळा जनार्दन घाडी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबत अधिक तपास टिळक नगर पोलीस करत असल्याची माहिती परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.
टिळकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चैन स्नॅचिंग करून चोरीच्या गुन्हयांचे वाढते प्रमाण पाहुन गुन्हे उघडकीस आणण्यासाठी टिळकगनर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी अहोरात्र सतर्कपणे गस्त करून, नाकाबंदी करून, रेकॉर्डवरिल गुन्हेगार चेक करून, जेल व बेल रिलीज आरोपींना तपासण्याची मोहीम राबवली. टिळकनगर पो.स्टे.मधील  गुन्हयाचा तपास तांत्रिक इनपुटच्या आधारे व गुप्त बातमीदारांमार्फत चैन स्नॅचिंग करणारे आरोपी यांची माहीती काढुन आरोपी विशाल सिध्दार्थ वाघ (२३), शंकर उर्फ शंखु संतोष जाधव (१९) दोघेही राहणार  ज्योतीनगर झोपडपट्टी, पाण्याच्या टाकीजवळ, आयरेगांव, डोंबिवली पुर्व यांना सापळा लावुन शिताफीने पकडुन अटक केली.
गुन्हयाच्या तपासादरम्यान त्यांना विश्वासात घेवुन त्यांच्याकडे चैन स्नॅचिंग चोरी करणाऱ्या आरोपीसंदर्भात सखोल तपास केला असता, त्यांनी त्यांचा साथीदार गजानन उर्फ भोला जनार्दन घाडी (२६) रा. आयरेगांव, ज्योतीनगर झोपडपट्टी, डोंबिवली पुर्व यांचेसह मिळुन एकुण ०४ ठिकाणी चैन चोरीचे गुन्हे केल्याचे सांगुन एका ठिकाणावरून ऑटो रिक्षा चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना या गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
या गुन्ह्यामध्ये एकुण ६५ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या ४ चैन गेल्या असून यापैकी ५१ ग्रॅम वजनाच्या २ लाख ५५ हजार किमतीच्या ०४ सोन्याच्या चैन मिळाल्या आहेत. सदरची कारवाई परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, डोंबिवली विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त जे. डी. मोरे, टिळकनगर पोलीस स्टेशनचे व.पो.नि. अभय धुरी,  पोलीस निरीक्षक (गुन्हे) नारायण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक विनोद कडलग यांनी तसेच सोबत सपोउनि चौगुले, पो. हवा. राठोड, पो.ना. भावसार, पो.ना. गोरले, पो.ना. थोरात, पो.शि. फड, पो.शि. सोनवणे यांनी केली आहे. या गुन्हयाचा तपास सहा. पोलीस निरीक्षक एस.एम.शेळके हे करीत आहेत.

 437 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.