१३ वर्षांवरील मुलींना होता येणार सहभागी
ठाणे : ठाणे सिटी फुटबॉल क्लबतर्फे मुलींसाठी फुटबॉल प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. गावंड बाग मैदानात होणाऱ्या या प्रशिक्षण वर्गात १३ वर्षांवरील मुलींना सहभागी होता येईल. प्रत्येक शनिवार आणि रविवारी होणाऱ्या या प्रशिक्षण वर्गाची सुरुवात ९ जानेवारीपासून होणार आहे. प्रशिक्षण वर्गाच्या मोफत चाचणी आणि अधिक माहितीसाठी ८१०८५५५५२५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
556 total views, 1 views today