नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाली निवड
शहापूर : मुरबाड शहर नगरपंचायतच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा ठाणे जिल्हा ग्रामीण सरचिटणीस असलेले सुभाष हरड यांची मंडल प्रभारी म्हणून निवड करण्यात आली आहे.
ग्रामपंचायत ,पंचायत समिती,जिल्हा परिषद, विधानसभा व लोकसभा तसेच सहकार व शैक्षणिक क्षेत्रातील विविध निवडणुकांत विजय मिळविण्याचे अचूक तंत्र अवगत असलेल्या सुभाष हरड यांच्याकडे हि जबाबदारी भाजपचे आमदार व जिल्हाध्यक्ष किसन कथोरे यांनी मोठ्या विश्वासाने सोपवली आहे.
सुभाष हरड यांना राजकारणातला दांडगा अनुभव असून ते किन्हवली येथील विद्या प्रसारक मंडळात अध्यापक म्हणून विद्यादानाचे कार्य करत आहेत.तर शहापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती असून सध्या ते शहापूर पंचायत समितीचे विद्यमान सदस्य व भाजपाचे गटनेते म्हणून काम करत आहेत.
943 total views, 10 views today