काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील यांचे घुमजाव,
म्हणे प्रसारमाध्यात आलेल्या बातम्यांवर प्रतिक्रिया देत नाही
मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणूका काँग्रेस एकट्याने लढविणार असल्याची घोषणा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील यांनी काँग्रेसच्या स्थापना दिन आणि मुंबई प्रदेश अध्यक्ष अशोक भाई जगताप यांच्या पदग्रहणानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात केली होती. मात्र त्याबाबत आज पुर्णतः घुमजाव करत प्रसारमाध्यमात आलेल्या वृत्तावर आपण भाष्य करत नसल्याचे सांगत अधिक बोलण्याचे टाळले.
नुकत्याच झालेल्या काँग्रेस स्थापना दिनाचे औचित्य साधत मुंबईचे नवे अध्यक्ष अशोक भाई जगताप यांच्या पदग्रहण सोहळ्याचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी पाटील यांनी एकला चलो रे ची घोषणा केली होती. त्यांच्यानंतर मुंबईचे पालक मंत्री अस्लम शेख, माजी मंत्री नसीम खान यांनीही याच पध्दतीचे वक्तव्य करत शिवसेना आणि राष्ट्रवादीला इशारा दिला.
परंतु आज त्यांनी त्याबाबत पूर्णतः यु टर्न घेत आगामी मुंबई महापालिका निवडणूका स्वबळावर लढविण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र त्याबाबत सूचना प्राप्त झाल्याचे सांगत कालच्या कार्यक्रमात फक्त शिवसेनेतील नेत्यांना इशारा देण्याचा होता असे त्यांनी स्पष्ट केले.
512 total views, 3 views today