भाजपचे उपाध्यक्ष रघुबर दास यांचे ढळलेय मानसिक संतुलन

देशातील व्यापारी माफिया, विषारी नाग असल्याचा केला उल्लेख
मुंबई : भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुबर दास यांनी एका राष्ट्रीय वृत्तपत्रात लिहिलेल्या एका लेखात शेतकरी आणि व्यापारी यांच्या वर्षोनुवर्षे असलेल्या सौंदहरपूर्ण संबंधात विष कालवण्याचे काम केले आहे. दास यांनी आपल्या लेखात बेजबाबदार आणि अपरिपक्व राजकारणी असल्याचे दाखवून देताना देशातील व्यापाऱ्यांचा  माफिया आणि नाग असल्याचे म्हंटले आहे. आमच्या सरकारने तीन कायद्यांच्या माध्यमातून दलालांच्या पाशवी विळख्यातून मुक्त केले असल्याचा उल्लेख दास यांनी आपल्या लेखात केला आहे. दास यांच्या या उल्लेखामुळे  देशातील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या संदर्भात कॉंफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना पत्र पाठवले आहे. दास हे घमंडी असून त्यांना सत्तेचा माज चढला आहे. व्यापाऱ्यांची निर्भत्सना केल्याबद्दल दास यांच्यावर कारवाई करण्याची मागणी कॅटने या पत्रात केली आहे. याशिवाय दास यांनी केलेला उल्लेख हा भाजपचे धोरण आहे का? जर नसेल तर उपाध्यक्ष असलेल्या व्यक्तीने असे वक्तव्य का केले हे स्पष्ट करावे अशी मागणीही कॅटने केली आहे.
दास यांच्या वक्तव्यावर देशातील व्यापाऱ्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे दास यांचे मानसिक संतुलन ढळले असून हुजरेगिरी करण्याची सवय त्यांच्या अंगात भिनली आहे. सत्तेचा माज असल्याने ते बेलगाम झाले आहेत. व्यापाऱ्यांचा माफिया, दलाल आणि नाग असा उल्लेख करून दास यांनी पक्षाचे किती मोठे नुकसान केले याचा अंदाज दास यांना आलेला नाही. भविष्यात दास यांनी कुठलीही निवडणूक लढली तर व्यापारी त्यांचा पराभव करणार हे निश्चित आहे. आता राजकीय संन्यास घेण्याची वेळ दास यांच्यावर आली आहे. ” विनाशकाले विपरीत बुद्धी”  ही म्हण दास यांनी आपल्या बोलण्यातून सिद्ध केली असल्याची खरमरीत टीका कॅटचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि ठाणे जिल्हा होलसेल व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुरेशभाई ठक्कर यांनी केली.
कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी सी भरतीया आणि प्रविण खंडेलवाल म्हणाले, देशात जवळपास १२ हजार अब्ज रुपयांची उलाढाल शेती व्यवसायात होते. त्यात कोट्यवधी व्यापारी रोजगार करत आहेत. सरकारने लागू केलेल्या तीन शेतकरी कायद्यांमुळे कृषी व्यवसायात एकाधिकारशाही वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे एकीकडे व्यापाऱ्यांच्या रोजगारावर गदा येण्याचे संकट उभे राहिले आहे तर दुसरीकडे दलाल, माफिया असा सतत उल्लेख करून व्यापाऱ्यांना अपमानित केले जात आहे. शेतकरी आपले पीक कुठेही विकू शकतो असे सांगितले जातेय. पण एक दोन एकर जमिन असणारे शेतकरी आपले पिक बाजारात घेऊन जाऊ शकतो का? हे केवळ मृगजळ आहे. प्रत्येक वेळी दलाल, माफिया असा उल्लेख करून शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांविरुद्ध भडकवले जात आहे. हे चुकीचे असून हजारो वर्षांपासून शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये असलेल्या घनिष्ठ संबंधात कटुता आणत आहेत.
राजकिय घडामोडी आणि शेतकरी कायदा एकाबाजूला आहेत. पण त्यामुळे व्यापारी आणि शेतकरी यांच्यात वर्षोनुवर्षे असलेल्या चांगले सबंध बिघडवण्याचे प्रयत्न करु नयेत. कायदे आज आहेत उद्या बदलले जातील.पण सामाजिक भेद निर्माण झाल्यास ते पुन्हा जोडणे कठीण होईल अशी भिती सुरेशभाई ठक्कर यांनी व्यक्त केली.

 585 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.