कोविड सेंटर कोणासाठी ?

रुग्ण कि कॉन्ट्रॅक्टरसाठी ? ठाणे भाजपने केला आरोप

ठाणे : एकिकडे कोविड रुग्ण घटतायंत, म्हणून स्वत:ची पाठ थोपटून घ्यायची. मात्र, कोट्यवधी खर्चून हॉस्पिटल उभारायची, असा नवा उद्योग महाविकास आघाडी सरकारने सुरू केलाय. ही हॉस्पिटल नक्की कोणासाठी उभारली जातायेत, रुग्ण की कॉट्रॅक्टरसाठी असा सवाल ठाणे भाजपने विचारला आहे.
ठाण्यात महापालिकेच्या हॉस्पिटलमधील १८७५ बेडवर अवघे २५२ रुग्ण आहेत. तर काही दिवसांपूर्वी उद्घाटन केलेल्या ७५५ बेडची दोन सेंटर रिकामी आहेत. पण आता ठाण्यात राज्य सरकार व महापालिकेच्या निधीतून आणखी ३ हजार १४४ बेडची रुग्णालये उभारली जातायंत. त्यातून जनतेचा पैसा कॉन्ट्रॅक्टरच्या खिशात जातोयं. इतकेच नव्हे तर रुग्णसेवेच्या नावाखाली रुग्ण नसतानाही उपचारांचे पैसै कॉन्ट्रॅक्टर आकारतोयं. कोविडचे निमित्त साधून कोट्यवधी रुपयांची लूट सुरू आहे, हे नक्की. भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या, भाजपाचे गटनेते संजय वाघुले व नगरसेवक मनोहरजी डुंबरे यांच्यासमवेत व्होल्टास, बोरिवडे आणि ग्लोबल हॉस्पिटलमध्ये भेट देऊन माहिती घेतली. त्यावेळी हा प्रकार उघड झाला.

 790 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.