कॅफेच्या आड सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर कल्याण क्राईम ब्रांचचा छापा

आधारवाडी नजीकच्या चसका कॅफेमध्ये तरुणाई हुक्क्याच्या नशेत धुंद, स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप

कल्याण : कॅफेच्या आड सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर कल्याण क्राईम ब्रांचचा छापा मारला असून  आधारवाडी नजीकच्या चसका कॅफेमध्ये तरुणाई हुक्क्याच्या नशेत धुंद असल्याचे पाहायला मिळाले. तर गेल्या अनेक दिवसांपासून याठिकाणी हा प्रकार सुरु असून स्थानिक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
पश्चिमेत आधारवाडी निक्की नगर परिसरात कॅफेच्या नावाखाली सुरू असणाऱ्या एका हुक्का पार्लरवर क्राईम ब्रांचने काल कारवाई केली. त्यावेळी १०० हून अधिक तरुण-तरुणी त्याठिकाणी हुक्क्याच्या नशेमध्ये धुंद असल्याचे दिसून आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचार बंदी लागू करण्यात आली आहे. मात्र ही संचारबंदी तसेच कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवत याठिकाणी कॅफेच्या नावाखाली खुले आम हुक्का पार्लर सुरू होते. याबाबत कल्याण क्राईम ब्रांचला मिळालेल्या माहितीच्या आधारे काल रात्री ११ च्या सुमारास या हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी १०० हुन अधिक तरुण तरुणी याठिकाणी हुक्क्याच्या नशेत पोलिसांना आढळून आले.
याप्रकरणी क्राईम ब्रांचकडून इथल्या ग्राहकांसह संबंधित कॅफेमालक आणि कर्मचान्यांविरोधात कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली. याठिकाणी आढळलेले हुक्क्याचे साहित्य क्राईम ब्रांचने जप्त केले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. ही कारवाई कल्याण क्राईम बॅचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षा संजू जॉन आणि त्यांच्या पथकाने केली आहे. दरम्यान कल्याणात आणखी काही ठिकाणी खुलेआमपणे अशा प्रकारचे हुक्का पार्लर सुरू असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्याठिकाणी असणारा तरुण तरुणींचा ओढा पाहता कल्याणातील अनेक प्रतिष्ठीत नागरिकांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. एखाद्या बड्या व्यक्तींच्या वरदहस्ताशिवाय हे हुक्का पार्लर सुरू राहणे अशक्य असून त्यावर वेळीच आवर घालणे आवश्यक असल्याचे मत हे प्रतिष्ठित नागरिक व्यक्त आहेत.

 310 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.