लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईतर्फे ७९ बाटल्या रक्तसंकलन

 नवी मुंबई येथील ज्ञानेश्वर शैलार समाज मंदीरामध्ये विरेंद्र म्हात्रे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने राबवला उपक्रम

नवी मुंबई : राज्यात सर्वत्र रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईने विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईच्या सदस्यानी यांनी शिबिरामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शवला. त्यामुळे एका दिवसात ७९ बाटल्या रक्त संकलित झाले आहे.
लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे संस्थापक अध्यक्ष विरेंद्र उर्फ गुरु म्हात्रे,लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई, उपाध्यक्ष अक्षय पाचारणे. लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईसचिव सचिन कोकरे ,लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई खजिदार रोशन पाटील, लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई उपखजिदार आलताफ शेख,लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई सदस्य प्रशांत पाटील, सोपनिल सोनवणे, किरण पंतगे,सोमनाथ बारवे,विक्की वांडे यांनी रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येक नैसर्गिक संकट आणि राष्ट्रीय आपत्ती यांमध्ये लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईमधील सदि आणि अन्य घटक नेहमीच साहाय्यासाठी पुढे येत असतात. त्यामुळे रक्तदानाचा तुटवडा भरून काढण्यासाठी आवाहन केल्यानंतर लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईमध्ये रांगा लागल्या होत्या.

 356 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.