इंग्लंडहून कल्याणात आलेल्या नागरीकांपैकी एक जण कोरोना पॉझेटीव्ह

५५ पैकी २० जणांचा शोध घेण्यास पालिकेला यश

कल्याण : इंग्लंडहून कल्याणात आलेल्या नागरीकांपैकी पैकी एक जण कोरोना पॉझेटीव्ह आला असून ५५ पैकी २० जणांचा शोध घेण्यास पालिकेला यश आले आहे. या  २० पैकी एक जण पॉझेटीव्ह असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे महापालिकेने कळविले आहे.
इंग्लंडमध्ये आढळून आलेल्या कोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत बदल झालेला नविन विषाणू स्ट्रेन दिसुन आल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या काळात इंग्लंडहून महानगरपालिका क्षेत्रात आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणात आतापर्यंत २० नागरिकांचे आरटी पीसीआर स्वॅब घेण्यात आले. त्यापैकी एका नागरिकाचा एन.आय.वी. मुंबई येथे पाठविण्यात आलेला आरटी पीसीआर चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून सदर नागरिकाची प्रकृती स्थिर असून त्यांस इतर कुठलीही लक्षणे दिसून आलेली नाहीत. या नागरिकास विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या नागरिकाचा चाचणी अहवाल जनुकिय रचनेच्या तपासणीसाठी एनआयवी मुंबई येथून एनआयवी पुणे येथे पाठविण्यात आला आहे.
सलग जोडून आलेल्या सुट्ट्या आणि येणाऱ्या नववर्षाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गर्दी करणे टाळावे, घराबाहेर फिरताना न चूकता मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टनसिंगचे पालन करावे आणि काही लक्षणे आढळल्यास महापालिकेच्या नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेने नागरिकांना केले आहे. 

 372 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.