नवीन पिढीला आपले सण समारंभ तसेच आपला ज्वलंत प्रज्वलित इतिहास याची ओढ लागावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कल्याण : शिवसेने अंतर्गत दिलीप कपोते फाउंडेशन आणि शिवस्व ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने “एक पाऊल इतिहास आणि परंपरेकडे” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नवीन पिढीला आपले सण समारंभ तसेच आपला ज्वलंत प्रज्वलित इतिहास याची ओढ लागावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात मुलांना भारतीय हिंदू संस्कृती मधील अनेक पैलू समजावून तसेच आपल्या पुरातन वांडमय याचे महत्व सांगितले. त्यानंतर भारतीय इतिहास, स्वराज्य आणि छत्रपती शिवाजी महाराज याविषयी माहिती दिली. या सर्वांमध्ये मुलांनी दर्शवलेला सहभाग त्यांनी काढलेली चित्रे त्यांच्यातील उत्साह अप्रतिम होता. दिलीप कपोते फाउंडेशन आणि शिवस्व ग्रुप असेच नवनवीन उपक्रम आणि शिवरायांचे विचार नवीन पिढीत रुजवण्याचे कार्य करीत राहील अशी माहिती आयोजक कल्पना कपोते यांनी दिली.
506 total views, 2 views today