लघु व मध्यम उद्योग, दुकाने, विक्रेते, होतकरू, व्यवसाय मालक, गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी जनजागृती कार्यक्रम या उपक्रमांतर्गत राबविण्यात आला.
ठाणे : यूनियन बँक ऑफ इंडिया मुंबई ठाणे प्रादेशिक कार्यालयामार्फत “यूनियन फीट ऑन स्ट्रीट कॅम्पेनचे ” आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी सायंकाळी हिरानंदानी घोडबंदर रोड शाखेत क्षेत्र महाव्यवस्थापक, मुंबई (यूनियन बँक ऑफ इंडिया) व्यंकटेश मुच्छल यांच्या हस्ते उपक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी ते म्हणाले की, यूनियन बँक नेहमीच एक जबाबदार कॉर्पोरेट राहिली आहे आणि आपल्या जबाबदाऱ्यांबरोबरच सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडण्यात नेहमीच अग्रणी राहिली आहे. “करोना काळातही ग्राहकांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आमची बँक ग्राहकांसोबतसोबत आहे. १०२ वर्षांपासून देशाच्या सेवेसाठी आमची बँक कार्यरत असून ग्राहकांच्या मनात विश्वास निर्माण करत आहे.
लघु व मध्यम उद्योग, दुकाने, विक्रेते, होतकरू, व्यवसाय मालक, गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी जनजागृती कार्यक्रम या उपक्रमांतर्गत राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत बँकेने ग्राहकांच्या दाराशी जाऊन सेवा दिली. समारोप कार्यक्रमाला यूनियन बँकेच्या रेणू के. नायर प्रादेशिक प्रमुख मुंबई ठाणे विभाग तसेच उपप्रादेशिक प्रमुख, सरल प्रमुख आणि शाखा प्रमुख तसेच बँकेचे ग्राहक उपस्थित होते.
580 total views, 1 views today