म्हाळगी व्याख्यानमालेसाठी राज्यपाल कोश्यारी उपस्थित राहणार

सरस्वती मंदिर शाळेच्या बंदिस्त पटांगणात दरवर्षीप्रमाणे ८ ते १४ जानेवारीपर्यंत ही व्याख्यानमाला होणार आहे. यंदा व्याख्यानमालेचे ३४ वे वर्ष आहे.

ठाणे : ठाणेकरांनी लोकप्रिय केलेल्या रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती व्याख्यानमालेचे संस्थापक तथा अध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी दिली.
कोविडच्या नियमांचे पालन करुन नौपाडा येथील सरस्वती मंदिर शाळेच्या बंदिस्त पटांगणात दरवर्षीप्रमाणे ८ ते १४ जानेवारीपर्यंत ही व्याख्यानमाला होणार आहे. यास राज्यपालांनी लेखी मान्यता दिली आहे. गेली ३४ वर्षे ही व्याख्यानमाला ठराविक दिवशी याच ठिकाणी आयोजित केली जात असून विशेष म्हणजे आतापर्यंत २३८ मान्यवरांनी उपस्थित राहून ठाणेकरांना मार्गदर्शन केले आहे. ज्ञान, प्रबोधन आणि मनोरंजन या त्रिसुत्रीवर व्याख्यानमाला  आधारलेली असून ठाणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे ही व्याख्यानमाला महाराष्ट्रात प्रतिष्ठित म्हणून मान्यता पावली आहे.

 418 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.