जे प्रवासी २५ नोव्हेंबरनंतर इंग्लंड येथून भारतात आले आहेत, त्यांनी स्वत:हून आपल्या जिल्हयाच्या, महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे तातडीने संपर्क साधून या सर्व्हेक्षणांस सहकार्य करावे आणि कोरोना विरुध्दच्या लढयात महापालिकेस मदत करावी असे करण्यात आले आवाहन
कल्याण : कोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत बदल झालेला नविन विषाणू स्ट्रेन आढळून आला असून या विषाणूचा प्रसार नेहमीपेक्षा अधिक वेगाने होऊ शकतो म्हणून २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या काळात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्व्हेक्षण कल्याण डोंबिवली मनपाच्या वतीने करण्यात येणार आहे.
सध्या इंग्लंडमधील काही भागात कोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत बदल झालेला नविन विषाणू स्ट्रेन आढळून आला असून या विषाणूचा प्रसार नेहमीपेक्षा अधिक वेगाने होऊ शकतो, असे तज्ञांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या काळात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. २५ नोव्हेंबर पासून इंग्लंडहून कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आलेल्या एकुण ५५ प्रवाशांची यादी प्राप्त झाली असून त्यांच्या सर्व्हेक्षणाची प्रक्रिया सुरु आहे.
महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असून कोरोनाची साथ आटोक्यात ठेवण्यासाठी महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर्स, लोकप्रतिनिधी यांच्या मदतीने गेले ९ महिने अहोरात्र प्रयत्न करीत आहे. अशा परिस्थितीत कोरोनाच्या नविन विषाणूचा प्रसार महापालिका क्षेत्रात, राज्यात, देशात होऊ नये यासाठी सर्वोतोपरी काळजी घेणे अत्यावश्यक आहे. यासाठी जे प्रवासी २५ नोव्हेंबर २०२० नंतर इंग्लंड येथून भारतात आले आहेत, त्यांनी स्वत:हून आपल्या जिल्हयाच्या, महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे तातडीने संपर्क साधून या सर्व्हेक्षणांस सहकार्य करावे आणि कोरोना विरुध्दच्या लढयात महापालिकेस मदत करावी असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
509 total views, 1 views today