ठाण्यातील पोलिसांचे आता मिशन रक्तदान

रक्ताचा तुडवडा भरुन काढण्यासाठी ठाण्यातील ५०० पोलिस पुढे सरसावले

ठाणे : कोरोनाच्या काळात रस्त्यावर २४ तास पहारा देऊन सर्वसामान्यांचे रक्षण करणाऱ्या ठाणे पोलिसांचा आणखीन एक मानवतेचा चेहरा समोर आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ठाणे पोलिसांनी शिबिराचे आयोजन केले. तब्बल १५० पोलिसांनी रक्तदान केले. तर ५०० पोलीस रक्तदान करून रक्त तुटवडा संपुष्टात आणण्यासाठी रक्तदान करण्याचा निर्धार ठाणे पोलिसांनी केला आहे. राज्यात रक्ताचा तुटवडा असल्याने ठाणे पोलीस पुढे आले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहना नंतर पोलीस सरसावले आहेत.
बुधवारी ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या उपस्थितीत ठाणे पोलिसांच्या रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली. कोरोनाच्या काळात जीवाचे रान करून माणुसकीचे दर्शन घडविणारे ठाणे पोलिसांनी रक्त तुटवडा दूर करण्याचा केलेल्या निर्धाराने ठाणे पोलिसांचा मानवतेचा नवा चेहरा पुढे आला आहे. शिबिराच्या प्रारंभानंतर काही काळातच तब्बल १५० पोलिसांनी रक्तदान केले. तर ५०० पोलीस कर्मचारी आणि अधिकारी हे रक्तदान करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
राज्यभरात रक्ताचा तुटवडा असताना विविध पक्ष, नेत्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिरे सुरु आहेत. त्यात ठाणे पोलिसांनीही आपला खारू ताईचा वाटा देत रक्तदान शिबिराचे आयोजन केले. या पोलिसांच्या रक्तदान शिबिराला ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर , पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाणे पोलीस मुख्यालयातील वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती होती.

 478 total views,  3 views today

Leave a Reply

Your email address will not be published.